TRENDING:

3 मोठे ग्रह एकाच राशीत, फायदा मात्र 6 राशींचा! प्रेम, पैसा सगळं मिळण्याची शक्यता

Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर आपलं सुख-दु:ख अवलंबून असतं. ग्रह-ताऱ्यांची चाल जशी बदलते, तसे आपल्या आयुष्यात चढ-उतार येतात. उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सूर्य आणि गुरू हे दोन्ही ग्रह वृषभ राशीत विराजमान आहेत. 19 मे रोजी शुक्राचाही याच राशीत प्रवेश होईल. त्यामुळे एकाच राशीत 3 मोठे ग्रह एकत्र येतील. अर्थात यातून एक अत्यंत शुभ योग निर्माण होईल. या 'त्रिग्रही' योगामुळे 6 राशींच्या व्यक्तींचा प्रचंड फायदा होणार आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7
3 मोठे ग्रह एकाच राशीत, फायदा मात्र 6 राशींचा! प्रेम, पैसा सगळं मिळण्याची शक्यता
मेष : खूप सोसलं, आता सर्व अडचणींपासून सुटका मिळेल. मागील बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आपल्याला परत मिळतील. नोकरी बदलण्यासाठी ही उत्तम संधी आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, व्यापार विस्तारेल.
advertisement
2/7
धनू : आपल्या करियरसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. घरात शुभकार्य पार पडू शकतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. परदेशी प्रवास होऊ शकतो.
advertisement
3/7
मीन : आपला व्यापार विस्तारेल. वैवाहिक जीवनात आणखी गोडवा येईल. आरोग्यासंबंधित सर्व तक्रारी दूर होतील. उत्पन्नवाढीचीही शक्यता आहे.
advertisement
4/7
मिथुन : आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता फायदा होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय करियरमध्येही उत्तम प्रगती होईल.
advertisement
5/7
कन्या : आपल्यासाठीसुद्धा हा काळ फायदेशीर ठरेल. आपला व्यापार विस्तारेल, जोडीदारासोबत सुखद प्रवास होईल. नोकरीत बढती मिळू शकते. आरोग्य सुधारल्याने कामाची गती वाढेल.
advertisement
6/7
वृश्चिक : आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड लाभ होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा <a href="https://news18marathi.com/religion/story-of-amrapali-and-gautama-buddha-who-captivated-kings-and-queens-with-their-beauty-gh-mhss-1182415.html">काळ</a> उत्तम असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
7/7
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/people-of-these-3-zodiac-signs-spend-money-like-water-l18w-mhij-1182558.html">श्रद्धे</a>वर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
3 मोठे ग्रह एकाच राशीत, फायदा मात्र 6 राशींचा! प्रेम, पैसा सगळं मिळण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल