गजलक्ष्मी राजयोग: स्वप्न साकार होण्याचा काळ, 'या' तारखेनंतर उजळेल 3 राशींचं नशीब
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ग्रहांच्या चालबदलाचा, स्थितीबदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. सर्व ग्रह, तारे वेळोवेळी आपली जागा बदलतात, ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. मग त्यातून काही राशींच्या व्यक्तींना सुखाचे दिवस पाहायला मिळतात, तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र अडचणींचा सामना करावा लागतो. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंद किशोर मुद्गल यांनी सांगितलं की, तब्बल 12 वर्षांनंतर 19 मे रोजी वृषभ राशीत गुरू आणि शुक्र ग्रहाची युती होणार आहे. या युतीतून 'गजलक्ष्मी राजयोग' निर्माण होतोय. याच योगामुळे 3 राशींच्या व्यक्तींवर अगदी सुखाचा वर्षाव होईल. आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुख, समृद्धी येईल. हा आपलं स्वप्न साकार होण्याचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/religion/after-12-years-golden-time-of-3-zodiac-signs-has-started-l18w-mhij-1173418.html">वृषभ</a> : आपल्यावर शुक्र आणि गुरू ग्रहाच्या युतीचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल. याच राशीत गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतोय, त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा असेल. परिणामी आपली आर्थिक प्रगती होईल, करियरमध्ये यश मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत अडकलेले पैसेही मिळतील. नवं काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विशेषत: मीडिया, मॉडेलिंग किंवा पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना प्रचंड लाभ मिळेल.
advertisement
3/5
तूळ : गुरू आणि शुक्राच्या युतीचा आपल्याला भरभरून फायदा होईल. विशेषत: अविवाहितांसाठी आता एक चांगलं स्थळ येण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तिर्थस्थळी प्रवास होऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधीही मिळू शकते. नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे.
advertisement
4/5
वृश्चिक : गुरू-शुक्राची युती आपल्यासाठी सुखाची ठरेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीचा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/jupiter-transit-will-change-the-dice-may-will-be-best-for-these-zodiac-signs-l18w-mhij-1173160.html">योग</a> आहे. वडिलांसोबतचं नातं भक्कम होईल. घरात आनंदाचं वातावरण असेल. हळूहळू आपली सर्व कामं पूर्ण होतील. व्यवसाय सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्यासाठी गजलक्ष्मी योग फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
गजलक्ष्मी राजयोग: स्वप्न साकार होण्याचा काळ, 'या' तारखेनंतर उजळेल 3 राशींचं नशीब