TRENDING:

गणपती बाप्पा मोरया...अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईच्या सिद्धीविनायकाला आंब्यांची आरास

Last Updated:
वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे 'अक्षय्य तृतीये'चा दिवस. या दिवशी दोन राजे आवर्जून आठवतात. एक म्हणजे धातूंचा राजा सोनं आणि दुसरा फळांचा राजा आंबा. या मुहूर्तावर अनेकजण सोनं खरेदी करतात, तर अनेकजण याच दिवसापासून आंबे खायला सुरूवात करतात. हीच बाब लक्षात घेऊन मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात खास आरास करण्यात आली होती. (प्रियंका जगताप, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
1/5
गणपती बाप्पा मोरया...अक्षय्य तृतीयेनिमित्त सिद्धीविनायकाला आंब्यांची आरास
वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभकार्यासाठी या दिवशी वेगळा मुहूर्त पाहायची गरज नसते, कारण हा पूर्ण दिवसच अत्यंत शुभ मानला जातो.
advertisement
2/5
10 मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यात विविध मंदिरांमध्ये या सणानिमित्त रेखीव सजावट करण्यात आली होती. 
advertisement
3/5
मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त आंब्यांची अत्यंत देखणी अशी आरास पाहायला मिळाली. आधीच बाप्पाचं सालस रूप, त्यात आंब्यांचा घमघमाट असं सुरेख वातावरण मंदिरात भाविकांना अनुभवायला मिळालं.
advertisement
4/5
अक्षय्य तृतीयेनिमित्त राज्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावली. खरंतर कोणत्याही मंदिरातील वातावरण अत्यंत भक्तिमय आणि प्रसन्न असतं, परंतु मंदिराला फुला-फळांची सजावट असेल तर ते आणखी मनमोहक होतं. सणानिमित्त राज्यातील अनेक मंदिरं अगदी गाभाऱ्यापर्यंत फुलांनी सजवण्यात आली होती. 
advertisement
5/5
मुंबईच्या सिद्धीविनायकाची ख्याती जगभरात आहे. इथं दररोज भाविकांची मांदियाळी असते. भाविक दूरदूरहून इथल्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. आज मंदिरात आंब्यांची सुंदर आरास पाहून भाविकही चकीत झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
गणपती बाप्पा मोरया...अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईच्या सिद्धीविनायकाला आंब्यांची आरास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल