TRENDING:

Astro Tips: घरातील वाद-भांडणे काही केल्या कमी होईनात? या सोप्या उपायांनी लगेच दिसेल परिणाम

Last Updated:
Astro Tips: संसारात वाद, भांडण-तंटे होतातच, मात्र ते रोजरोज होऊ लागले, की घर म्हणजे लॉजिंग-बोर्डिंग होतं. सुख आणि समाधान घरातून हद्दपार होतं. एकमेकांशी चर्चा करून हे वाद सोडवता येऊ शकतात, पण कुटुंबीयांना तसं करावंसं वाटत नाही. अशा वेळी ज्योतिषशास्त्रातले उपाय कामी येऊ शकतात. कुटुंबातला कलह दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. 
advertisement
1/7
घरातील वाद-भांडणे काही केल्या कमी होईनात? या सोप्या उपायांनी लगेच दिसेल परिणाम
घरात दररोज वाद, तंटा होत असेल, तर घरातलं वातावरण खराब होतं. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. कुटुंबातल्या लहान मुलांवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. याचं कारण पितृदोष किंवा ग्रहांची दशा हे असू शकतं.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज कुटुंबीय किंवा शेजाऱ्यांशी वाद होत असतील, तर रोज सकाळी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. वास्तुदोषही काही प्रमाणात कमी होतो. मात्र गुरूवार व शुक्रवारी या पद्धतीने फरशी पुसू नये. ते शुभं नसतं. हे वाद ग्रह-नक्षत्रांमुळे होत असतील, तर घरात एकदा नवग्रह पूजा नक्की करून घ्या. यामुळे घरात सुख नांदतं व पत्रिकेतल्या ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो. घरातल्या सदस्यांची प्रगती होते. पूजा करताना ज्योतिषतज्ज्ञांची मदत घ्यावी.
advertisement
3/7
अमावास्या किंवा श्राद्ध पक्षांमध्ये पितरांना तर्पण किंवा जेवण द्यावं. कोणत्याही शुभ कार्यात त्यांचं स्मरण अवश्य करावं. कावळा, कुत्रा, गाय व चिमण्यांना खायला घालावं. मुंग्यांना पीठ खाऊ घालावं. वड किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं. यामुळे पितृदोष दूर होतो. पितरांच्या आशीर्वादामुळे घरात शांतता व सुख नांदतं. कुटुंबीयांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो.
advertisement
4/7
घरात नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील, तर बायकोने नवऱ्याच्या उशीखाली रात्री झोपताना एक कापराची वडी ठेवावी. सकाळी नवऱ्याला न सांगताच ती कापराची वडी जाळावी व त्याची राख वाहत्या पाण्यात सोडावी. असं केल्यानं दोघांमधलं प्रेम टिकून राहील व नातंही घट्ट होईल. घरातल्या ईशान्य कोपऱ्यात दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
advertisement
5/7
घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. सकाळी व संध्याकाळी मारूतीसमोर पंचमुखी दिवा लावावा. अष्टगंध जाळून त्याचा सुगंध सगळ्या घरात पसरू द्यावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच, शिवाय घरातल्यांची प्रगतीही होते. तसंच लहान मुलांचे आजार, शिक्षणातले अडथळे आणि वाद यापासून सुटका होते.
advertisement
6/7
अंथरूणावर बसून जेवणं ही वाईट सवय आहे. अनेकांना ही सवय असते, पण ती अशुभ समजली जाते. उष्टी भांडी स्वयंपाकघरात ठेवणं, बाहेरच्या चपला घरात आणणं यामुळेही घरात अनेक समस्या उद्भवतात. जिथे आपण झोपतो, त्या बेडवर बसून जेवू नये, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं.
advertisement
7/7
आरोग्याबरोबरच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही या सवयी हिताच्या आहेत. घरातले वाद सोडवण्यासाठी एखाद्या समुपदेशकाची मदत घेता येऊ शकते, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रातले हे उपायही उपयोगी पडू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astro Tips: घरातील वाद-भांडणे काही केल्या कमी होईनात? या सोप्या उपायांनी लगेच दिसेल परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल