TRENDING:

मृत व्यक्तीचे दागिने वापरू नये? नाहीतर रडत काढावे लागतात दिवस?

Last Updated:
आपल्याकडून कळत-नकळतपणे अशा अनेक चुका घडतात, ज्यांची शिक्षा नंतर भोगावी लागते. ज्योतिषशास्त्रात आपल्या रोजच्या जीवनातली अशी काही कामं सांगितलेली आहेत जी आपण सर्रास करतो पण ती आपली चूक असते. परिणामी आपली प्रगती खुंटते. शिवाय कुंडलीत वेगवेगळे दोष निर्माण होतात, म्हणूनच अडचणी सोसाव्या लागतात. (शिखा श्रेया, रांची)
advertisement
1/5
मृत व्यक्तीचे दागिने वापरू नये? नाहीतर रडत काढावे लागतात दिवस?
झारखंडच्या रांचीमधील ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी सांगितलं की, मृत व्यक्तींच्या कोणत्याही वस्तू वापरू नये. वाचायला कितीही विचित्र वाटलं तरी त्यांच्या वस्तू लवकरात लवकर घराबाहेर काढून नदीत प्रवाहित कराव्या किंवा जाळून टाकाव्या कारण त्या वापरल्यास आपल्या कुंडलीत पितृदोष निर्माण होऊ शकतो.
advertisement
2/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींचे कपडे तर अजिबात वापरू नये. शिवाय त्यांचे बूट, घड्याळ किंवा कोणते दागिने वापरल्यासही आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो. मग अगदी ते सोन्याचे महागडे दागिने असतील तरीही. महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तींनी वापरेली बेडशीट तर मूळीच वापरू नये. 
advertisement
3/5
ज्योतिषांनी एका धार्मिक पुस्तकाचा संदर्भ देऊन ही माहिती सांगितली आहे. त्यानुसार ते म्हणाले, व्यक्ती जीवंत असताना तिच्या भावना तिने वापरलेल्या वस्तूंशी जोडलेल्या असतात. जर आपण त्याच वस्तू वापरल्या तर कदाचित त्या व्यक्तीचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर पडू शकतो. आपली सर्व लहान-मोठी कामं रखडतील. मग लाख प्रयत्न करूनही आपल्याला अडचणींमधून डोकं वर काढता येणार नाही. 
advertisement
4/5
संतोष कुमार सांगतात की, मृत व्यक्तीचे महागडे <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/akshaya-tritiya-2024-do-not-miss-the-muhurat-of-buying-gold-jewelry-l18w-mhij-1175921.html">सोन्याचे</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-news-from-may-6-to-12-the-week-is-lucky-for-whom-l18w-mhij-1176513.html">दागिने</a> असतील तर ते जाळणं किंवा नदीत प्रवाहित करणं अशक्य आहे. त्यामुळे निदान ते तसेच्या तसे वापरू नका. त्यांपासून नवीन दागिने घडवा. म्हणजेच जर आपल्या जवळच्या मृत नातेवाईकाची चैन असेल तर तिला अंगठीचं रूप देऊन तुम्ही वापरू शकता. त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्यातल्या भावना बऱ्यापैकी कमी होतील. परंतु इतर सर्व वस्तू व्यक्तीच्या मृत्यूनंतर न विसरता 24 तासांच्या आत नदीत प्रवाहित करा. त्या तशाच्या तशा वापरू नका, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मृत व्यक्तीचे दागिने वापरू नये? नाहीतर रडत काढावे लागतात दिवस?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल