brahma yog: तो दिवस आला, आजपासून तयार झाला ब्रह्म योग, 5 राशींचं नशीब पालटणार!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
भगवान विष्णूला समर्पित असलेला हा गुरुवारचा दिवस पाच राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ ठरणार आहे. या व्यक्तींवर श्रीहरी अर्थात विष्णूची मोठी कृपा राहील.
advertisement
1/7

दोन मे 2024 रोजी चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत गोचर करणार आहे. याच दिवशी शुक्ल योग, ब्रह्म योग आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोगही बनत आहे. भगवान विष्णूला समर्पित असलेला हा गुरुवारचा दिवस पाच राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ ठरणार आहे. या व्यक्तींवर श्रीहरी अर्थात विष्णूची मोठी कृपा राहील. या व्यक्तींना जीवनात नशिबाची साथ मिळेल, धन-धान्याची वृद्धी होईल. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ या.
advertisement
2/7
सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा, अर्थात दोन मे हा दिवस शुभ फलदायी आहे. धन-धान्य वाढेल. उद्दिष्टपूर्तीची वाटचाल सोपी होईल. प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे मोठा लाभ होईल. सिंगल व्यक्तींना जोडीदार मिळू शकतो. सगळी कामं अगदी सहजपणे होत जातील. अधिकारी वर्गाची साथ मिळेल. तसंच, वैवाहिक जीवनही चांगलं राहील.
advertisement
3/7
मीन : दोन मे हा दिवस मीन राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. नवे संपर्क प्रस्थापित होतील आणि त्यांच्या माध्यमातून मोठा लाभही होईल. नशिबाच्या मदतीने सारी कामं पूर्ण होतील. आर्थिक समृद्धी वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुवर्णसंधी मिळू शकेल. प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. एखादी अत्यंत महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. गुंतवणूकही करू शकाल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील.
advertisement
4/7
मिथुन : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी दोन मे हा दिवस चांगला राहील. मनोरंजनाच्या संधी प्राप्त होतील. काही व्यक्ती धार्मिक स्थळी जाऊ शकतील. आपल्या माणसांसोबत वेळ व्यतीत करतील. नव्याने व्यापार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नातेवाईकांशी नाती मजबूत होतील. आरोग्यही चांगलं राहील.
advertisement
5/7
तूळ : दोन मे हा दिवस तूळ राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम असेल. संपत्ती आणि उत्पन्नात चांगली वाढ होईल. नेतृत्वक्षमता वाढेल. भगवान विष्णूच्या कृपेने यशात वाढ होईल. करिअरमधल्या समस्या दूर होतील. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकेल.
advertisement
6/7
मकर : मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन मे हा दिवस खूप उत्तम असेल. चांगली बातमी मिळू शकेल. अनपेक्षित लाभ होऊ शकेल. जोडीदाराचा शोध संपू शकेल, म्हणजेच जोडीदार सापडेल. घरात उत्सवी वातावरण असेल. व्यापारी व्यक्तींना लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. विद्यार्थ्यांना चांगला रिझल्ट मिळेल.
advertisement
7/7
Disclaimer: ( इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या न्यूज18 मराठी सहमत नाही. न्यूज 18 मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
brahma yog: तो दिवस आला, आजपासून तयार झाला ब्रह्म योग, 5 राशींचं नशीब पालटणार!