कडक ऊन सोसलं, जून सावली घेऊन येईल! 6 राशींसाठी या महिन्याचा प्रत्येक दिवस सुखाचा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिना महत्त्वाचा असतो, परंतु यंदा जून महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. कारण या महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंगळ ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होणार आहे. तर, 12 जूनला सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 14 जूनला बुध ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश होईल. मग 29 जूनला बुध कर्क राशीत जाईल. तर, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश करेल. या मोठ्या ग्रहांच्या राशीबदलामुळेच हा महिना महत्त्वाचा आहे. काही राशींच्या वाट्याला यातून दुःख येईल हे खरंय, परंतु 6 राशींच्या व्यक्तींचं जीवन अक्षरशः सुखाने उजळून निघेल. उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी याबाबत माहिती दिली आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7

मेष : आपल्यासाठी हा महिना अतिशय फायदेशीर असणार आहे. आपली सर्व अपूर्ण कामं या काळात पूर्ण होतील. कुटुंबासोबत एक उत्तम प्रवास होईल. करियरमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
advertisement
2/7
वृषभ : आपल्या सुखात निश्चितच वाढ होणार आहे, शिवाय करियरही भक्कम होईल. व्यापारात मोठा नफा होईल. आपले अडकलेले पैसे आता परत मिळतील. दाम्पत्य जीवनात सुख येईल, समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
3/7
सिंह : आपल्यासाठी जून महिना अत्यंत महत्त्वाचा ठरेल, नवनवीन संधी मिळतील. समाजात \मान-सन्मान वाढेल. सुख-समृद्धी द्विगुणित होईल. अडकलेली कामं आता मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
advertisement
4/7
कन्या : आपल्यासाठी हा महिना अत्यंत फायदेशीर आहे. भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात सुख, शांती, समृद्धीचं आगमन होईल.
advertisement
5/7
तूळ : आपल्यासाठी जून महिन्याचे 30 दिवस सुखाचे असतील. आरोग्यासंबंधित सर्व तक्रारी दूर होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. करियरमध्ये यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल.
advertisement
6/7
धनू : आपल्यासाठीसुद्धा जून महिना सर्वोत्तम आहे. आपली <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/change-the-direction-of-the-plants-if-you-have-even-1-of-these-7-l18w-mhij-1186763.html">आर्थिक स्थिती</a> भक्कम होईल. व्यापारात यश मिळेल. अनेक काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/3-zodiac-signs-should-take-care-of-themselves-june-could-be-dangerous-l18w-mhij-1186597.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कडक ऊन सोसलं, जून सावली घेऊन येईल! 6 राशींसाठी या महिन्याचा प्रत्येक दिवस सुखाचा