TRENDING:

गुरूच्या राशीप्रवेशानं खेळ बदलेल, मे महिना खूप उलथापालथीचा; नोकऱ्या सांभाळा!

Last Updated:
जेव्हा गुरू ग्रह रास बदलतो आणि त्याचा ज्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो त्या राशींच्या व्यक्तींना भरभरून सुख अनुभवायला मिळतं. परंतु ज्या राशींवर गुरूचा नकारात्मक प्रभाव पडतो त्या राशींच्या वाट्याला मात्र अडचणी येतात. आता 1 मे रोजी दुपारी 2:29 वाजता गुरू ग्रह मेष राशीतून बाहेर पडेल आणि त्याचा वृषभ राशीत प्रवेश होईल. यातून कोणासाठी हा महिना अत्यंत सुखाचा असेल आणि कोणाला दु:ख सोसावं लागेल, जाणून घेऊया. ज्योतिषी डॉ. अनीष व्यास यांनी याबाबत माहिती दिली आहे. (कृष्णा कुमार गौड, प्रतिनिधी / जोधपूर)
advertisement
1/13
गुरूच्या राशीप्रवेशानं खेळ बदलेल, मे महिना खूप उलथापालथीचा; नोकऱ्या सांभाळा!
मेष : आपल्याला अनेक सुवर्ण संधी मिळतील, धनलाभ होईल. शुभकार्यांदरम्यान खर्च होण्याची शक्यता आहे. उच्च-प्रतिष्ठित लोकांचा संपर्क वाढले.
advertisement
2/13
वृषभ : उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असेल. त्यामुळे खर्च जरा जपून करा. आरोग्य जपा. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. 
advertisement
3/13
मिथुन : आपण खूप सतर्कतेने राहावं. अजिबात कोणत्या वादात पडू नये. आर्थिक अडचणी येतील. प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतील.
advertisement
4/13
कर्क : गुरूच्या कृपेने आपल्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. पैसे, गुंतवणूक, प्रवास या सर्वंच बाबतीत सुख मिळेल. प्रत्येक कार्य पुर्णत्तवाला जाईल.
advertisement
5/13
सिंह : आपल्याला मेहनतीने केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. अनावश्यक ताणामुळे आरोग्य बिघडेल.
advertisement
6/13
कन्या : आपल्याला आपल्या मेहनतीनुसार यश मिळेल. खरंतर हा आपल्या प्रगतीचा काळ आहे, असं म्हणायला हरकत नाही. परंतु संधीचं सोनं करता यायला हवं. 
advertisement
7/13
तूळ : मानसिक अशांतता आणि वाद-विवादाचा सामना करावा लागेल. एखादं नवं काम हाती घ्याल, त्यातून वर्षभरानंतर भरपूर फायदा मिळेल. प्रवासात मात्र काळजी घ्या.
advertisement
8/13
वृश्चिक : आपल्याला सर्वच बाबतीत सुख मिळेल. आपला मान-सन्मान वाढेल. विचारही परिपक्व होतील. 
advertisement
9/13
धनू : अनावश्यक अडचणींमुळे आपला खर्च वाढेल. आजारपण येऊ शकतं. शत्रू आपल्यावर भारी पडतील. सतर्कतेनं कामं करा. जवळच्या व्यक्तीशी भांडण होऊ शकतं.
advertisement
10/13
मकर : उच्च शिक्षणात यश मिळेल. अविवाहितांचं आता लग्न जुळण्याची शक्यता आहे. प्रगतीसाठी उत्तम संधी मिळेल, त्यासाठीच भरपूर मेहनत घ्यावी लागेल.
advertisement
11/13
कुंभ : विचार करून निर्णय घेतल्यास, मनापासून प्रयत्न केल्यास अडचणी कमी होतील. वाद-विवादही हळूहळू दूर होतील. सुख-समाधान मात्र टिकून राहील. आर्थिक व्यवहार करताना जरा जपून.
advertisement
12/13
मीन : मेहनतीचं फळ मिळेल. नोकरी-व्यवसायातील बदलामुळे मात्र तणाव निर्माण होईल. परंतु योग्य निर्णय घेतले तर प्रगतीच होईल.
advertisement
13/13
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
गुरूच्या राशीप्रवेशानं खेळ बदलेल, मे महिना खूप उलथापालथीचा; नोकऱ्या सांभाळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल