TRENDING:

बुध-शुक्र आणतील लक्ष्मी-नारायण योग! 3 राशींना होईल जबरदस्त लाभ, अयोध्येच्या ज्योतिषांनी सांगितलं

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र ग्रहाच्या युतीतून लक्ष्मी-नारायण योग निर्माण होतो. सध्या शुक्र ग्रह मेष राशीत विराजमान आहे. तर, येत्या 10 मेला ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाचाही मेष राशीत प्रवेश होईल. जेव्हा 2 ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा त्या ग्रहांची युती झाली असं म्हणतात. म्हणजे 10 मे रोजी लक्ष्मी-नारायण योग निर्माण होईल. ज्यातून 3 राशींच्या व्यक्तींना प्रचंड सुख मिळणार आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5
बुध-शुक्र आणतील लक्ष्मी-नारायण योग! 3 राशींना होईल जबरदस्त लाभ
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ग्रह वेळोवेळी राशीप्रवेश करतात, त्यातून वेगवेगळे योग निर्माण होतात. ज्यांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. मग त्यातून काही राशींच्या व्यक्तींना सुख मिळतं, तर काही राशींच्या वाट्याला दुःख येतं. आता लक्ष्मी-नारायण योग कोणासाठी फलदायी असणार जाणून घेऊया.
advertisement
2/5
मिथुन : या राशीच्या व्यक्तींना या काळात भरपूर आर्थिक नफा मिळणार आहे. गुंतवणुकीत अडकलेले पैसे किंवा कोणाला उधार दिलेले पैसे आता आपल्याला परत मिळतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळेल. व्यवसायातही फायदा होईल, दाम्पत्य जीवनात सुख येईल.
advertisement
3/5
सिंह : नवं वाहन खरेदीसाठी हा योग अत्यंत अनुकूल आहे. आपला आत्मविश्वास या काळात द्विगुणित होईल. पैसे मिळतील, व्यवसाय विस्तारेल, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, परदेशी प्रवास होऊ शकतो, आजारपणही दूर होईल.
advertisement
4/5
वृषभ : आपल्याला या काळात <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-do-not-do-these-things-on-akshaya-tritiya-even-by-mistake-l18w-mhij-1175469.html">भाग्याची पुरेपूर साथ</a> मिळेल. आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/angarak-yog-is-very-dagerous-know-everything-about-it-l18w-mhij-1175484.html">वाद-विवाद</a> आता मिटतील.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
बुध-शुक्र आणतील लक्ष्मी-नारायण योग! 3 राशींना होईल जबरदस्त लाभ, अयोध्येच्या ज्योतिषांनी सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल