शनिवारी मंगळ प्रवेश; 42 दिवस महत्त्वाचे, 'या' राशींवर चक्क पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की, जेव्हा एक ग्रह एखाद्या विशिष्ट राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. आता येत्या 1 जून रोजी, शनिवारी मंगळ ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होईल. दुपारी 3 वाजून 39 मिनिटांनी मंगळ मेष राशीत प्रवेश करेल, त्यानंतर 12 जुलैपर्यंत त्याचा इथंच मुक्काम असेल. या 42 दिवसांच्या कालावधीत एक अत्यंत सुखद असा योग निर्माण होणार आहे, ज्यातून काही राशींच्या व्यक्तींवर जणू पैशांचा वर्षाव होऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी याबाबत माहिती दिली आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

मेष : याच राशीत मंगळ ग्रहाचा प्रवेश होणार असल्याने आपल्यासाठी हा काळ प्रचंड लाभदायक ठरेल. विशेषतः करियरमध्ये फायदा होईल. मागील बऱ्याच काळापासून अडकलेली आपली कामं आता मार्गी लागतील. व्यवसायात नवे फायदेशीर व्यवहार होतील. नव्या लोकांच्या भेटीगाठी घडतील. ज्यातून पुढे प्रचंड लाभ होईल.
advertisement
2/5
कर्क : आपल्यासाठी मंगळचा राशीप्रवेश अत्यंत फायदेशीर ठरेल. नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल. शिवाय उत्पन्नातही वाढ होईल. मंगळच्या प्रभावाने नवं काम मिळेल. ज्यामुळे उत्पन्न वाढेल.
advertisement
3/5
सिंह : या काळात करियरमध्ये विशेष प्रगती होईल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल. धनसंपत्तीबाबत लाभ होईल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. करियरमध्ये आपल्या कामाचं कौतुक होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
धनू : आपल्यासाठी परदेशी प्रवासाचा <a href="https://news18marathi.com/religion/may-2025-has-many-shubh-muhurat-for-weddings-mhij-1181193.html">योग</a> आहे. करियरमध्ये प्रगती होईल. मंगळ प्रवेशाने <a href="https://news18marathi.com/religion/4-zodiac-signs-destiny-is-likely-to-change-this-month-mhij-1181108.html">उत्पन्नाचे नवे स्रोत</a> निर्माण होतील. आपली बचतही <a href="https://news18marathi.com/religion/do-not-step-out-immediately-after-drinking-milk-here-is-the-reason-mhij-1181224.html">उत्तम</a> होईल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनिवारी मंगळ प्रवेश; 42 दिवस महत्त्वाचे, 'या' राशींवर चक्क पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता