TRENDING:

Kuber Yoga: रखरखत्या उन्हात पाऊस पडेल, पैशांचा! May महिना 3 राशींचा

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह, तारे ठराविक वेळी आपली स्थिती आणि चाल बदलतात. त्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो, मग त्यातून काहींच्या वाट्याला सुख येतं, तर काहींच्या वाट्याला दु:ख येतं. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यातून अनेक शुभ योग तयार होतात. मग ज्या राशींवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो, त्यांच्या वाट्याला भरपूर सुख येतं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी, अयोध्या)
advertisement
1/5
Kuber Yoga: रखरखत्या उन्हात पाऊस पडेल, पैशांचा! May महिना 3 राशींचा
गुरू हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. येत्या 1 मे रोजी गुरूचा शुक्र राशीतून वृषभ राशीत प्रवेश होणार आहे. या राशीप्रवेशातून अत्यंत शुभ असा कुबेर <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/rare-coincidence-after-100-years-4-zodiac-signs-destiny-will-change-l18w-mhij-1166634.html">योग</a> तयार होतोय. या काळात काही राशींच्या व्यक्तींवर चक्क पैशांचा पाऊस पडेल. या महिन्यात ते मालामाल होणार असून त्यांची सगळी कर्ज फिटतील. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, कुबेर योगाचा ज्या राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडेल त्यांना लक्ष्मी देवीचा भरभरून आशीर्वाद मिळेल. त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. या <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/chaitra-navratri-has-lightened-up-the-destiny-of-3-zodiac-signs-l18w-mhij-1165690.html">भाग्यवान राशी</a> कोणत्या आहेत, पाहूया.
advertisement
2/5
वृषभ : आपली स्थिती सुधारेलच, शिवाय हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. करियरमधील सर्व अडचणी दूर होतील, आत्मविश्वास वाढेल, प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल, व्यवसाय विस्तारेल, आयुष्यात लक्ष्मीचं आगमन होईल, शारीरिक, मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
advertisement
3/5
कन्या : आपल्या वैवाहिक जीवनात भरपूर सुख येईल. धार्मिक प्रवास होईल, करियरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. समाजात मान-सन्मान वाढेल, नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
advertisement
4/5
कर्क : आपल्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, धनसंपत्ती मिळेल, प्रलंंबित कामं पूर्ण होतील, व्यवसाय विस्तारेल, जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Kuber Yoga: रखरखत्या उन्हात पाऊस पडेल, पैशांचा! May महिना 3 राशींचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल