TRENDING:

पैसा पाण्यासारखा खर्च करतात! 'या' 3 राशींच्या व्यक्तींच्या हातात पैसे टिकणं अवघड

Last Updated:
पैसा हा सध्या जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक झाला आहे. काही व्यक्तींच्या कुंडलीत राजयोग असतो, त्यामुळे धनसंपत्तीच्या बाबतीत ते प्रचंड लकी असतात. तर काहीजणांना पैसे मिळवण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. परंतु पैसे टिकवायचे कसे, हे सर्वांसाठीच मोठं आव्हान असतं, ते ज्यांना झेपतं तेच खरे नशीबवान म्हणायचे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5
पैसा पाण्यासारखा खर्च करतात! 'या' 3 राशींच्या व्यक्तींच्या हातात पैसे टिकणं अवघड
उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, राशीवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो, त्याचे गुण कळतात आणि अवगुणही लक्षात येतात. काही राशींच्या व्यक्ती पैसे फार विचारपूर्वक खर्च करणाऱ्या असतात, तर काही राशींच्या व्यक्तींच्या हातात पैसा टिकतच नाही. या राशी नेमक्या कोणत्या, पाहूया.
advertisement
2/5
तूळ : या राशीच्या व्यक्ती कायम भौतिक सुखांकडे आकर्षित होतात. त्यांना महागडे कपडे, बूट आणि घड्याळ वापरण्याची आवड असते. त्यासाठी ते कितीही पैसे खर्च करू शकतात. भलेही त्यांचं उत्पन्न कमी असेल तरी खर्च भरपूर होतो. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी मेहनत करण्याचीही त्यांची पूर्ण तयारी असते. म्हणूनच त्यांच्याकडे कायम पुरेशा प्रमाणात पैसे असतात. 
advertisement
3/5
धनू : वायफळ खर्च करण्यात या राशीच्या व्यक्तींचा हात कोणीच धरू शकत नाही. बजेटच्या बाहेर असेल तरी जी वस्तू त्यांना आवडते ती ते खरेदी करतातच. परंतु त्यांचा जास्त खर्च पुस्तकं किंवा धार्मिक कार्यासंबंधित वस्तूंवर होतो. शिवाय आपली पर्सनालिटी उठून दिसावी यासाठी कपड्यांवरही त्यांचा खूप खर्च होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वत:पेक्षा जास्त खर्च आपल्या जवळच्या व्यक्तींवर करतात. म्हणूनच त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन लोक त्यांना अक्षरश: लुटतात.
advertisement
4/5
मकर : या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान मानल्या जातात. परंतु जेव्हा मुद्दा बचतीचा येतो, तेव्हा सर्वात आळशीपणात त्यांचाच क्रमांक पहिला लागतो. कारण त्यांच्याकडून विनाकारण <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/money-horoscope-today-15-may-2024-in-marathi-read-your-daily-rashi-bhavishya-in-marathi-gh-mhrp-1181637.html">खर्च</a> भरपूर होतो. हा खर्च भलेही फार जास्त नसला तरी लहान लहान खर्चांनी त्यांचं बजेट कोलमडतं. जर त्यांच्या खर्चावर कोणी <a href="https://news18marathi.com/religion/know-right-way-of-worship-of-shanidev-your-all-problems-will-solved-mhkd-1182233.html">नियंत्रण</a> ठेवलं नाही, तर त्यांचं आयुष्य अडचणींनी भरून जातं
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
पैसा पाण्यासारखा खर्च करतात! 'या' 3 राशींच्या व्यक्तींच्या हातात पैसे टिकणं अवघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल