TRENDING:

प्रेम, पैसा, प्रमोशन... May महिन्यात 3 राशी होणार मालामाल, कसलीच कमी नाही भासणार!

Last Updated:
बऱ्याच काळानंतर आता गुरू आणि शुक्र ग्रहाची युती होणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींचा अक्षरश: भाग्योदय होईल. त्यांना धन, ऐश्वर्य, करियर अशा सर्वच बाबींमध्ये सुख अनुभवायला मिळेल. मध्यप्रदेशातील नर्मदापुरमचे ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली आहे. (दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी / नर्मदापुरम)
advertisement
1/5
प्रेम, पैसा, प्रमोशन... May महिन्यात 3 राशी होणार मालामाल, कसलीच कमी नाही भासणार
मे महिन्यात गुरू आणि शुक्र ग्रह वृषभ राशीत एकत्र येतील. बऱ्याच काळानंतर हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे 3 राशींचं नशीब उजळून निघेल. जाणून घेऊया, त्या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत. 
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/religion/may-will-be-the-best-month-for-this-zodiac-sign-l18w-mhij-1168258.html">वृषभ</a> : आपल्यासाठी गुरू आणि शुक्र ग्रहाची युती लाभदायी ठरेल. कारण आपल्या कुंडलीतील लग्न स्थानी ही युती होणार आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आपलं व्यक्तीमत्त्व आधीपेक्षा अधिक प्रखर होईल. वैवाहिक आयुष्यात सुख येईल. करियरमध्ये प्रगती होईल. विशेषत: मीडिया, मनोरंजन, मॉडलिंग, लेखन, कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींची विशेष प्रगती होईल. अविवाहितांना आता लग्नासाठी उत्तम स्थळ येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/saturn-will-get-angry-if-you-make-this-silly-mistake-says-vasu-shastra-l18w-mhij-1165651.html">वाद</a> मिटतील आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल.
advertisement
3/5
मेष : आपल्यासाठी गुरू-शुक्रची युती <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/chaitra-navratri-has-lightened-up-the-destiny-of-3-zodiac-signs-l18w-mhij-1165690.html">फलदायी</a> ठरेल. विशेषत: आपल्या धनसंपत्ती आणि वाणीवर सकारात्मक प्रभाव पडेल. आपल्याला अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. करियरमध्ये बढती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवी नाती जुळतील, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
advertisement
4/5
सिंह : ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्यासाठी गुरू आणि शुक्राची युती शुभ ठरेल. कारण आपल्या कुंडलीच्या कर्म स्थानी ही युती निर्माण होतेय. ज्यामुळे आपल्या करियर आणि कामकाजावर सकारात्मक प्रभाव पडेल, आपली प्रगती होईल. शिवाय मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वेतनवाढही होऊ शकते. या काळात मोठी गुंतवणूक करायला काही हरकत नाही. या काळात वडिलांसोबत चांगले संबंध निर्माण होतील. आपल्यासाठी हा काळ म्हणजे हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल असा शुभ असेल.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
प्रेम, पैसा, प्रमोशन... May महिन्यात 3 राशी होणार मालामाल, कसलीच कमी नाही भासणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल