Priya Marathe : '... अन् दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया गेली', मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं! सुबोध भावेने सांगितला डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Subodh Bhave on Priya Marathe Death : अभिनेत्री प्रिया मराठेच्या अचानक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. आजारपणाच्या काळात प्रिया कोणाच्याच संपर्कात नव्हती. प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय झालं होतं हे अभिनेता आणि तिचा भाऊ सुबोध भावे याने सांगितलं.
advertisement
1/9

अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरनं निधन झालं. प्रियाच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण मराठी इंडस्ट्री हादरली आहे.
advertisement
2/9
प्रियाबरोबरने तिच्या आजारपणात कधीच तिच्या कोणत्याही मित्र मैत्रिणींना भेटली नाही. ती कोणत्या अग्नी दिव्यातून जात होती हे फक्त तिलाच माहिती होतं.
advertisement
3/9
प्रियाचं अचानक जाणं सगळ्यांसाठी धक्कादायक होतं. प्रियाच्या निधनाच्या आदल्या दिवशी नेमकं काय झालं हे तिचा चुलत भाऊ अभिनेता सुबोध भावे यानं एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
4/9
सुबोध आणि प्रिया हे सख्खे चुलत भाऊ-बहिण. दोघांनी बऱ्याच कलाकृतींमध्ये एकत्र काम केलं. पण प्रिया कॅन्सरशी झुंज देत असताना मात्र कोणाच्याच संपर्कात राहिली नाही, असं सुबोधनं सांगितलं.
advertisement
5/9
लोकमत फिल्मीशी बोलताना सुबोध भावेनं प्रियाच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीबद्दल सांगितलं. सुबोधनं सांगितलं की, "आताच्या काळात 2-3 महिन्यात लोकांचे डिवोर्स झालेले आपण ऐकतो. अशा काळात प्रियाच्या आजारपणात शंतनु ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला."
advertisement
6/9
"भाऊ म्हणून प्रियाचं कौतुक आहेत. पण शंतनुचंही कौतुक आहे कारण त्याने काम सोडून संपूर्ण वेळ त्याने प्रियाला दिला. शंतनुने काम सोडलं होतं."
advertisement
7/9
सुबोधनं पुढे सांगितलं, "शंतनुने एक नवीन काम घेतलं होतं त्याचा पहिला एपिसोड प्रिया जाण्याच्या आदल्या रात्री टेलिकास्ट झाला होता."
advertisement
8/9
"तो पहिला एपिसोड आदल्या रात्री प्रियाने पाहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि त्याच्यासमोरच ती गेली."
advertisement
9/9
"वेड्यासारखं दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं. परत ते वेगळ्या रुपात एकमेकांसमोर येतील तेव्हाही ते एकमेकांचे असतील इतकं त्यांचं सुंदर आणि घट्ट नातं होतं. मला त्याचा खूप अभिमान आहे", असंही सुबोधनं सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe : '... अन् दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया गेली', मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं! सुबोध भावेने सांगितला डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग