Dashavatar Collection : 'दशावतार' पहिल्याच दिवशी 'आरपार'! बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dashavatar Day 1 Box Office Collection : दशावतार या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर हा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज झालाय. सिनेमानं पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.
advertisement
1/8

12 सप्टेंबरला एक दोन नाही तर तब्बल तीन मराठी सिनेमे रिलीज झालेत. पहिल्या दिवशी कोणता सिनेमा यशस्वी ठरतोय हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती.
advertisement
2/8
'दशावतार', 'बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' असे तीन मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले. या सिनेमांचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
advertisement
3/8
'दशावतार'ने पहिल्याने दिवशी आरपार कमाई केली आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतारा या बहुप्रतिक्षीत सिनेमानं पहिल्या दिवसी चांगली कमाई करण्यात यश मिळवलं आहे.
advertisement
4/8
कोकणात, गणेशोत्सवासोबतच दशावतार ही कलापरंपरा दिमाखात साजरी केली जाते. या सांस्कृतिक परंपरेला मोठा सलाम करणारा 'दशावतार' हा भव्य मल्टीस्टारर सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
advertisement
5/8
दशावतार सिनेमा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. मुंबई, पुण्यातील अनेक थिएटर हाऊसफुल्ल होते.
advertisement
6/8
'सॅकनिल्क'च्या माहितीनुसार, दशावतार या सिनेमानं पहिल्या दिवशी भारतात 57 लाखांची कमाई केली आहे. तर सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन हे 65 लाख इतकं झालं.
advertisement
7/8
हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरच्या 'आरपार' या सिनेमानं पहिल्या दिवशी भारतात 13 लाखांची कमाई केली आहे.
advertisement
8/8
तर प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या बिन लग्नाची गोष्ट या सिनेमानं भारतात 8 लाखांची कमाई केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar Collection : 'दशावतार' पहिल्याच दिवशी 'आरपार'! बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई