TRENDING:

घरात असेल निगेटिव्ह एनर्जी तर दिसतात 'ही' लक्षण, चुकूनही करू नका याकडे दुर्लक्ष, नाही तर…

Last Updated:
वास्तुशास्त्र आणि अध्यात्मात ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा प्रगतीत अडथळे आणि घरात अशांती निर्माण करते.
advertisement
1/7
घरात असेल निगेटिव्ह एनर्जी तर दिसतात 'ही' लक्षण, चुकूनही करू नका याकडे दुर्लक्ष
वास्तुशास्त्र आणि अध्यात्मात ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा प्रगतीत अडथळे आणि घरात अशांती निर्माण करते. अनेकदा आपल्या घरात काही अदृश्य नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो, जो आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही. मात्र, घरातील वातावरण आणि घडणाऱ्या घटनांवरून याचे स्पष्ट संकेत मिळतात. जर तुमच्या घरातही विनाकारण समस्या उद्भवत असतील, तर खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
2/7
सततची आजारपणे आणि थकवा: घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील आणि वैद्यकीय उपचार करूनही गुण येत नसेल, तर हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते. घरात प्रवेश करताच थकवा जाणवणे किंवा उत्साहाचा अभाव वाटणे हे देखील अशुभ संकेत आहेत.
advertisement
3/7
विनाकारण होणारे वादविवाद: ज्या घरात नकारात्मकता असते, तिथे किरकोळ कारणावरून मोठे वाद होतात. घरातील सदस्यांमध्ये प्रेमाऐवजी एकमेकांबद्दल चिडचिड निर्माण होते. घराच्या वातावरणात एक प्रकारचा जडपणा जाणवतो.
advertisement
4/7
तुळस आणि झाडे सुकणे: तुळशीचे रोप हे घरातील ऊर्जेचे सर्वात मोठे दर्शक आहे. जर तुम्ही योग्य काळजी घेऊनही घरातील तुळस वारंवार सुकत असेल, तर समजून जा की घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढला आहे.
advertisement
5/7
घरामध्ये विचित्र वास येणे: घर स्वच्छ असूनही अचानक एखादा दुर्गंध येणे किंवा कुबट वास येणे, हे नकारात्मक ऊर्जा असल्याचे दर्शवते. विशेषतः रात्रीच्या वेळी असा अनुभव आल्यास सतर्क राहणे आवश्यक आहे.
advertisement
6/7
घरातील पाळीव प्राण्यांचे वागणे: कुत्रे किंवा मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना नकारात्मक ऊर्जा लवकर जाणवते. जर तुमचा पाळीव प्राणी घराच्या एखाद्या विशिष्ट कोपऱ्याकडे बघून विनाकारण ओरडत असेल किंवा घाबरत असेल, तर त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती असू शकते.
advertisement
7/7
कामात येणारे अडथळे आणि आर्थिक नुकसान: अचानक आर्थिक संकट येणे, हाताशी आलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडणे आणि घरात पैसा न टिकणे हे नकारात्मकतेचे मोठे संकेत आहेत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
घरात असेल निगेटिव्ह एनर्जी तर दिसतात 'ही' लक्षण, चुकूनही करू नका याकडे दुर्लक्ष, नाही तर…
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल