January Horoscope 2026: सरता जानेवारी भाग्य उजळून जाणार; उरलेत फक्त 24 तास, 3 राशींचा सुवर्णकाळ आलाच
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
January Horoscope 2026: काही राशींच्या लोकांची भाग्य चमकण्याची वेळी आली आहे. द्रिक पंचांगानुसार, तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि शुक्र मिळून एक अत्यंत दुर्मिळ असा संयोग निर्माण करत आहेत. या योगामुळे काही राशींना मान-सन्मान आणि प्रगती मिळू शकते. 28 जानेवारी 2026 रोजी, म्हणजे उद्या, शनि आणि शुक्र एकमेकांपासून 45 अंशांवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषात शनिला अत्यंत शक्तिशाली ग्रह मानले जाते आणि लवकरच शनि शुक्रासोबत संयोग साधणार आहे, ज्याला अर्धकेंद्र योग असे म्हणतात. ज्योतिषांच्या मते, हे विश्लेषण चंद्रराशीच्या आधारे करण्यात आले आहे.
advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रात अर्धकेंद्र योग अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो. एखाद्याच्या कुंडलीत हा योग निर्माण झाल्यास चांगला काळ सुरू होतो, असे मानले जाते. जाणून घेऊया 28 जानेवारीला तयार होणाऱ्या अर्धकेंद्र योगाचा फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो.
advertisement
3/5
वृषभ - अर्धकेंद्र राजयोग तयार झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. वृषभ राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र नवव्या भावात आणि शनि तिसऱ्या भावात असणार आहे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाधान मिळेल. सुख-समृद्धीचे योग तयार होत आहेत. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायातही अनेक शुभ संधी मिळू शकतात. अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढेल आणि त्यामुळे धार्मिक यात्रांचे योगही संभवतात.
advertisement
4/5
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी शनि-शुक्र अर्धकेंद्र योग खूपच फायदेशीर ठरू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांना हा योग संमिश्र फळ देऊ शकतो. कार्यकुशलतेमुळे शत्रूंवर मात करण्यात यश मिळेल. जमीन-जुमल्यासंबंधी चांगला लाभ होऊ शकतो. जोडीदार आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.
advertisement
5/5
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होणार आहे. आर्थिक स्थिती अजून चांगली होईल आणि यशाची नवी उंची गाठण्याची ही योग्य वेळ आहे, कारण उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू होऊ शकतात. प्रवासाचे योग तयार होत असून त्यातून यशाला नवी दिशा मिळेल. अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, कारण प्रबळ योग तुमच्या बाजूने आहेत. शनिदेवाच्या कृपेने आरोग्यही चांगले राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
January Horoscope 2026: सरता जानेवारी भाग्य उजळून जाणार; उरलेत फक्त 24 तास, 3 राशींचा सुवर्णकाळ आलाच