Hanuman Jayanti 2025: महाराष्ट्रातील 13 गावांत हनुमानाची नाही तर जांबुवंताची होते पूजा, इथं आहे देशातील एकमेव मंदिर!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Hanuman Jayanti 2025: महाराष्ट्रातील गावागावात हनुमान मंदिर पाहायाल मिळतं. परंतु, 13 गावं अशी आहेत जिथं हनुमान नाहीतर जांबुवंताची पूजा केली जाते.
advertisement
1/9

महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. परंतु, जालना जिल्ह्यातील जामखेड आणि आसपास तेरा गावामध्ये हनुमानाचे मंदिर नाही. या गावातील लोक मारूती ऐवजी जांबुवंत याना आराध्य मानतात व त्यांचीच पुजा करतात.
advertisement
2/9
हनुमानाला आपल्या शक्तीची अन् प्राबल्याची जाणीव करून दिल्यानंतर या तेरा गावात मारूती ऐवजी जांबुवंताची पुजा होऊ लागली. अशी आख्यायिका सांगितली जाते. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/9
अंबड तालुक्यातील जामखेड गावाला जांबुवंत मंदिरामुळे देशभरात ओळख मिळाली आहे. देशातील एकमेव जांबुवंतांचे मंदिर येथे असल्याचा दावा या गावातील ग्रामस्थ करतात. त्यामुळेच या गावात हनुमानाचे मंदिर नसून जांबुवंतांनाच पहिला मान दिला जातो.
advertisement
4/9
जामखेडने जांबुवंत मंदिरामुळे मिळालेली आपली वेगळी ओळख कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विशेष म्हणजे दररोज मोफत अन्नदान करणारे हे एकमेव गाव असल्याचा ग्रामस्थांना अभिमान वाटतो.
advertisement
5/9
गावापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर हे जांबुवंताचं मंदिर आहे. मंदिरात पाणी योजनेतून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय गावाची महती ऐकून येथे देशाच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सेवेसाठी येथे दररोज दुपारी 11 ते 2 या वेळेत मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
6/9
एकट्या जामखेड गावानेच नाहीत तर या गावाच्या परिसरात येणाऱ्या वाड्यांनीही यात योगदान देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. त्यासाठी प्रत्येक दानशूर व्यक्तीला वर्षभरातील एक दिवसाची जबाबदारी देण्यात आली असून 365 दिवसांचे अन्नदान करणाऱ्यांची यादी अगोदरच जाहीर करण्यात आलेली आहे.
advertisement
7/9
जामखेड गावातील गुहेत जांबुवंतांचा निवास असल्याची या भागातील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या ग्रामस्थांनी आता येथे एक मंदिर बांधले आहे. या मंदिरात जांबुवंतांसोबत नळ व नीळही विराजमान आहेत. संपूर्ण परिसर निसर्गरम्य असून संस्थानने मंदिर परिसरात बऱ्याच सुविधा पुरवल्या आहेत.
advertisement
8/9
जांबुवंतावरून परिसराचे नाव जामखेड पडल्याचे मानले जाते. आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. शुक्रवार हा जांबुवंतांचा वार असतो. त्यामुळे शुक्रवारीही येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
advertisement
9/9
सर्वच गावांमध्ये प्रत्येक कार्याची सुरुवात श्री हनुमंतांच्या स्मरणाने होते, परंतु जामखेड आणि परिसरातील 13 गावांमध्ये पहिला मान जांबुवंतांचा आहे. त्यामुळेच येथील पंचक्रोशीत हनुमानाचे मंदिर नाही. हे ग्रामस्थ जांबुवंतांचेच भक्त आहोत. जांबुवंत व हनुमान दोघेही श्रीरामांचे भक्त होते. जांबुवंत वयाने ज्येष्ठ असल्याने आम्ही त्यांचीच पूजा करतो, असे ग्रामस्थ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Hanuman Jayanti 2025: महाराष्ट्रातील 13 गावांत हनुमानाची नाही तर जांबुवंताची होते पूजा, इथं आहे देशातील एकमेव मंदिर!