TRENDING:

Shiv Jayanti 2025: महाराष्ट्रात इथं आहेत छत्रपती शिवरायांची मंदिरे, आपण पाहिली का?

Last Updated:
Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांची कोल्हापुरात 2 ऐतिहासिक मंदिरे आहेत. याठिकाणी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
advertisement
1/5
Shiv Jayanti: महाराष्ट्रात इथं आहेत छत्रपती शिवरायांची मंदिरे, आपण पाहिली का?
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित अनेक स्फूर्तिस्थळे देशभरात पाहायला मिळतील. पण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांची मंदिर हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहेत. त्यापैकी कोल्हापुरात देखील 2 मंदिरे आहेत.
advertisement
2/5
कोल्हापुरातील नर्सरी बागेजवळ सिध्दार्थ नगर परिसरात ऐतिहासिक व धार्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले छ. शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर 1911 साली छ. शाहू महाराजांनी बांधले होते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या दुमजली मंदिराचे बांधकाम अत्यंत सूबक आहे. या मंदिरात शिवाजी महाराजांच्या पादुका आहेत, जे त्याचे विशेष धार्मिक महत्त्व दर्शवतात. संस्थान काळापासून घाटगे कुटुंब मंदिराची देखभाल करत आहे आणि आजपर्यंत मंदिरातील पूजा नियमितपणे सुरू असते.
advertisement
3/5
19 फेब्रुवारीला या ठिकाणी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी ऐतिहासिक भवानी मंडप येथून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक लावजम्यासह पालखी नर्सरी बागेपर्यंत जाते. छत्रपती घराण्यातील सदस्य या सोहळ्याला उपस्थित राहतात आणि यावेळी शिव जन्मकाळ सोहळ्याचे आयोजनही केले जाते.
advertisement
4/5
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक स्मारके बांधली, त्यापैकी एक महत्त्वाचे स्मारक म्हणजे पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर होय. या मंदिरात असलेल्या 1.5 ते 2 फूट आकाराच्या संगमरवरातील अश्वारूढ मूर्तीची 19913 साली प्रतिष्ठापन करण्यात आली. कागल येथील प्रसिद्ध मूर्तिकार सुतार यांनी ही मूर्ती तयार केली होती.
advertisement
5/5
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाही पन्हाळा गडावर असताना या मंदिरात प्रत्यक्ष दर्शन घेणं आवडत असे. शाहू महाराज या मंदिरात शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय गडावरून बाहेर पडत नव्हते. आजही अनेक शिवप्रेमी युवक व युवती पन्हाळगडावर आले की, या मंदिराच्या दर्शनाने आपली यात्रा सुरू करतात. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Shiv Jayanti 2025: महाराष्ट्रात इथं आहेत छत्रपती शिवरायांची मंदिरे, आपण पाहिली का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल