TRENDING:

Vastu tips : चावी ठेवताना तुम्ही करता ही चूक? होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान

Last Updated:
Vastu tips : आपल्याकडे चाव्यांचा जुडगा नेहमी असतो, पण आपण कधीच त्या कुठे ठेवायच्या हा विचारही करत नाही. किल्ल्या त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवण्याऐवजी त्या आपण नेहमी इकडे तिकडे ठेवतो.
advertisement
1/7
Vastu tips : चावी ठेवताना तुम्ही करता ही चूक? होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान
आपल्या सर्वांच्या घराच्या किल्ल्या असतात. काही किल्ल्या दरवाज्याच्या कुलुपाच्या असतात, काही तिजोरीच्या असतात, काही ऑफिसच्या, किंवा काही किल्ल्या गाडीच्या असतात. यापैकी काही किल्ल्या कामाच्या असतात, तर काही किल्ल्या बिनकामाच्या असतात.
advertisement
2/7
आपल्याकडे चाव्यांचा जुडगा नेहमी असतो, पण आपण कधीच त्या कुठे ठेवायच्या हा विचारही करत नाही. किल्ल्या त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवण्याऐवजी त्या आपण नेहमी इकडे तिकडे ठेवतो. काही वेळा तर आपल्याला किल्ल्या कुठे ठेवल्यात हे आठवत नाही. मग त्या किल्ल्या शोधण्यातच वेळ वाया जातो.
advertisement
3/7
यामुळे फक्त वेळच वाया जात नाही तर वास्तुदोषही निर्माण होतात. वास्तूच्या दृष्टिकोनातून, किल्ल्या त्यांच्या जागी नसणं चांगलं मानलं जात नाही. किल्ल्या घरात कुठे आणि कोणत्या दिशेने ठेवायच्या? या बाबत भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे.
advertisement
4/7
किल्ल्या नेहमी योग्य दिशेला ठेवाव्या. दुकान आणि ऑफिसच्या किल्ल्या नेहमी वायव्य दिशेला ठेवणं चांगलं मानलं जातं. तर तिजोरीची किल्ली नैऋत्य दिशेला ठेवावी. ही खूप चांगली दिशा मानली जाते, यामुळे घरात भरभराट राहते.
advertisement
5/7
किल्ली हरवू नये, असा विचार करून आपण पूजेच्या ठिकाणी अनेकदा लहान आकाराची घराची किल्ली ठेवतो. पण वास्तूनुसार पूजेच्या ठिकाणी किल्ल्या कधीही ठेवू नयेत. असं केल्याने मन पूजापाठ करण्यापासून विचलित होऊ लागतं. तसंच, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ लागतो, त्यामुळे कधीही पूजेच्या ठिकाणी किल्ल्या ठेवू नका.
advertisement
6/7
ब्रह्मस्थानावर किल्ल्या ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते, कारण किल्ल्या धातुच्या बनलेल्या असतात आणि ब्रह्मस्थानात ठेवल्यास त्याचा विपरित परिणाम होऊ लागतो. यासोबतच या किल्ल्यांमुळे घरातील परस्पर संबंधांवरही नकारात्मक परिणाम होतो आणि घरात क्लेश होतात.
advertisement
7/7
ईशान्य कोपऱ्यात घराच्या किल्ल्या ठेवू नये, कारण आपण किल्ल्या स्वच्छ करत नाही. त्या खूप घाणेरड्या असतात आणि जर आपण अशा घाणेरड्या किल्ल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्या तर त्याचा नकारात्मक प्रभाव होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ईशान्य कोपऱ्यात धातूच्या वस्तू कधीही ठेवू नयेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu tips : चावी ठेवताना तुम्ही करता ही चूक? होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल