Asia Cup 2025 : ना शुभमन गिल ना सूर्या! टीम इंडियाच्या या खेळाडूसमोर पाकिस्तानला फुटतो घाम
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत सरकारने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने येणार आहेत. पण तुम्हाला माहिती का? पाकिस्तान टीम इंडियाच्या एका खेळाडूला घाबरतो.
advertisement
1/5

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान येत्या 14 सप्टेंबर रोजी आमने सामने येतील. दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी सामना जिंकण्यासाठी मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरतील.
advertisement
2/5
बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानला टेन्शनच आलं. कारण टीम इंडियाचा एका खेळाडूला स्कॉडमध्ये संधी मिळाली. हा खेळाडू कोण? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.
advertisement
3/5
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आहे. हार्दिक पांड्याने भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
4/5
पांड्याने पाकिस्तानविरुद्ध 7 सामने खेळले असून, 7.25 च्या इकॉनॉमीने 13 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने आतापर्यंत 114 टी20 सामने खेळले असून 8.20 च्या इकॉनॉमीने 94 विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
5/5
आशिया कपमध्ये सर्वाधिक 8 वेळा विजेतेपद पटकावणारा संघ भारत आहे. तर पाकिस्तानने 2 वेळा हा किताब जिंकला आहे. तर आशिया कपमध्ये टीम इंडियाचं पारडं जड राहिलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : ना शुभमन गिल ना सूर्या! टीम इंडियाच्या या खेळाडूसमोर पाकिस्तानला फुटतो घाम