TRENDING:

गोलंदाजी बघून संघात घेतले, पण पठ्ठ्याचा फलंदाजीत राडा, टीम संकटात असताना वादळी शतक

Last Updated:
आकिब नबी हा जम्मु काश्मीरचा खेळाडू आहे.मागच्या अनेक वर्षापासून तो आयपीएल प्रवेशाची वाट पाहत होता.आणि यंदाच्या हंगामात आता त्याची प्रतिक्षा संपणार आहे.
advertisement
1/7
गोलंदाजी बघून संघात घेतले, पण पठ्ठ्याचा फलंदाजीत राडा, टीम संकटात असताना वादळी श
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त सामने पार पडतायत. या स्पर्धेत आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची कामगिरी देखील पाहण्यासारखी आहे.
advertisement
2/7
दरम्यान अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेला आणि यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सने 8.40 कोटी रूपयात खरेदी केलेल्या या खेळाडूने वादळी खेळी कली आहे.
advertisement
3/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून आकिब नबी आहे.आकिब नबी हा जम्मु काश्मीरचा खेळाडू आहे.मागच्या अनेक वर्षापासून तो आयपीएल प्रवेशाची वाट पाहत होता.आणि यंदाच्या हंगामात आता त्याची प्रतिक्षा संपणार आहे.
advertisement
4/7
याच आकिब नबीने आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खतरनाक खेळी केली आहे. हैद्राबादने जम्मू काश्मीरसमोर 268 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
advertisement
5/7
या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरचा डाव गडगडला होता. जम्मूचे 90 धावांवर 7 विकेट पडले होते.
advertisement
6/7
त्यामुळे जम्मू काश्मीरचा पराभव होईल असे वाटत होते.पण याच दरम्यान आकिब नबीने 82 बॉलमध्ये 114 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 10 चौकार मारले होते.
advertisement
7/7
आकिब नबीसोबत वंशज शर्माने देखील 69 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या बळावर या दोन्ही पुठ्ठ्यांनी 47.5 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत 3 विकटसने हा सामना जिंकला आहे. त्यामुळे धारदार गोलंदाजी करणाऱ्या आकिब नबीची फलंदाजी पाहून सगळेच शॉक झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
गोलंदाजी बघून संघात घेतले, पण पठ्ठ्याचा फलंदाजीत राडा, टीम संकटात असताना वादळी शतक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल