अंडर 16च्या खेळाडूंना IPL बंदी,वैभव सुर्यवंशीच काय होणार? काय आहे BCCI चा नवीन नियम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीसीसीआयने लागू केलेले नियम आयपीएल 2026 पासून लागू होतील.जर आयपीएल स्काउट्सना एखादा तरुण खेळाडू आढळला तर त्यांना प्रथम प्रथम श्रेणी सामना खेळावा लागेल.त्यानंतरच तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र ठरेल
advertisement
1/7

बीसीसीआयने आज एकाच दिवशी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. एक म्हणजे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड केली आहे. तर दुसरं म्हणजे अंडर 16च्या खेळाडूंना IPL मध्ये बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
2/7
बीसीसीआय आयपीएलबाबत नवीन नियम लागू केला आहे. या नवीन नियमामुळे तरुण भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवण्यात अडचणी येणार आहेत.यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्नही भंगण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
बीसीसीआयने 16 वर्षांखालील खेळाडूंसाठी नवीन नियम लागू केला आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी 16 वर्षांखालील खेळाडूंना आता किमान एक प्रथम श्रेणी सामना खेळावा लागणार आहे.जो खेळाडू ही आवश्यकता पूर्ण करण्यात अयशस्वी ठरेल त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई केली जाईल.
advertisement
4/7
वैभव सुर्यवंशी हा 14 वर्षांचा खेळाडू यंदाच्या हंगामात आयपीमध्ये खेळला होता. पण आता त्याला 2026 च्या आयपीएल हंगामात खेळता येणार आहे का? हे पाहूयात.
advertisement
5/7
आयपीएलमध्ये पदार्पणापूर्वी वैभव सूर्यवंशीने प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यामुळे, जरी हा नियम लागू केला असता तरी त्याचा वैभव सूर्यवंशीवर कोणताही परिणाम झाला नसता.
advertisement
6/7
आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी जर भारतीय क्रिकेटमधील 16 वर्षांचा खेळाडू ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाही त्याची आयपीएलसाठी निवड झाली तरी त्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची आवश्यकता राहणार नाही.
advertisement
7/7
बीसीसीआयने लागू केलेले नियम आयपीएल 2026 पासून लागू होतील.जर आयपीएल स्काउट्सना एखादा तरुण खेळाडू आढळला तर त्यांना प्रथम प्रथम श्रेणी सामना खेळावा लागेल.त्यानंतरच तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र ठरेल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
अंडर 16च्या खेळाडूंना IPL बंदी,वैभव सुर्यवंशीच काय होणार? काय आहे BCCI चा नवीन नियम