Cheteshwar Pujara : 365 दिवस सहन केलं, बरोबर 26 नोव्हेंबरलाच आयुष्य संपवलं, चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याच्या मृत्यूची INSIDE STORY
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याच्या मेहुण्याने राजकोट येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जीत रसिकभाई पाबारी असे त्याचे नाव आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याच्या मेहुण्याने राजकोट येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जीत रसिकभाई पाबारी असे त्याचे नाव आहे. या घटनेने पुजारासह कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
2/7
पुजाराच्या मेहुणा जीतने नेमकी आत्महत्या का केली? याचं मुख्य कारण अद्याप समोर आलं नाही आहे. पण या आत्महत्येमागे त्याची होणारी बायको जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
advertisement
3/7
कारण पुजाराच्या मेहुण्याच्या मृत्यूमागे एक योगायोग समोर आला आहे. तो म्हणजे गेल्यावर्षी जीत पाबारीवर त्याच्या होणाऱ्या बायकोने 26 नोव्हेंबर 2024 ला बलात्काराची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वर्षभरानी आता याच दिवशी जीत पाबारीने टोकाचं पाऊलं उचललं आहे.
advertisement
4/7
कारण पुजाराच्या मेहुण्यावर त्याच्या होणाऱ्या बायकोने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत जीतवर लग्नाच्या बहाण्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता.
advertisement
5/7
ही सगळी घटना दोघांचा साखरपूडा होण्या अगोदर घडली होती.तसेच या घटनेनंतर लग्न मोडण्यात आलं होतं.पण या तक्रारीनंतर पुजाराच्या मेहुणा प्रचंड तणावात होता.वर्षभर तो सगळ्या गोष्टीमुळे तणावात गेला होता.त्यामुळेच त्याने बरोबर वर्षभरानंतर टोकाचं पाऊल उचललं आहे.
advertisement
6/7
जीत पाबारी हा राजकोटमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील होता. पाबारी कुटुंब मूळचे जामजोधपूरचे आहे परंतु गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राजकोटमध्ये राहत आहे.
advertisement
7/7
जीत गेल्या वर्षभरापासून कायदेशीर खटल्याचा सामना करत होता आणि तो बराच ताणतणावात होता.पण आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे,असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Cheteshwar Pujara : 365 दिवस सहन केलं, बरोबर 26 नोव्हेंबरलाच आयुष्य संपवलं, चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याच्या मृत्यूची INSIDE STORY