TRENDING:

CSK ने उगाच 14 कोटी नाही मोजले! कॅच पकडताना गंभीर इजा, 7 टाके बसले तरी पठ्ठ्याने मैदान सोडलं नाही,कोण आहे खेळाडू?

Last Updated:
लिलावात दोन अनकॅप खेळाडूंनी धुमाकुळ घातला होता. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा अशी या दोघांची नाव आहेत. या दोन्ही खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी 14 कोटी 20 लाखाला ताफ्यात घेतलं होतं.
advertisement
1/7
CSK ने उगाच 14 कोटी नाही मोजले! कॅच पकडताना गंभीर इजा, 7 टाके बसले तरी पठ्ठ्याने
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात युवा खेळाडूंना अनपेक्षित अशी बोली लागली.तर स्टार खेळाडूंना फ्रेंचायजींना फारसा भाव दिला नाही.
advertisement
2/7
या लिलावात दोन अनकॅप खेळाडूंनी धुमाकुळ घातला होता. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा अशी या दोघांची नाव आहेत. या दोन्ही खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी 14 कोटी 20 लाखाला ताफ्यात घेतलं होतं. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू सर्वाधिक बोली लागले अनकॅप खेळाडू ठरले होते.
advertisement
3/7
या दोघांपैकी प्रशांत वीरची प्रचंड चर्चा रंगली आहे. कारण प्रशांत वीर हा 2020 ला क्रिकेट सोडणार होता. पण आयुष्यात असा टर्न आला की आज तो आयपीएल 2026 सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला आहे.
advertisement
4/7
प्रशांतची पहिल्यांदा युपी अंडर 19 स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि कुंचबिहारी ट्ऱॉफीमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
advertisement
5/7
नुकत्याच पार पडलेल्या युपी टी20 लीगमध्ये त्याने नोएडाकडून खेळताना 320 धावा केल्या आणि 8 विकेटस घेतल्या होत्या. या त्याच्या निवडीचं हे एक कारण आहे.
advertisement
6/7
दुसरं कारण म्हणजे, एका टूर्नामेंटमध्ये खेळताना प्रशांत वीरच्या चेहऱ्यावर बॉल लागला होता. या अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावर 7 टाके पडले होते.तरी त्याने ती स्पर्धा सोडली नाही. त्याने त्या स्पर्धेत 376 धावा केल्या आणि 18 विकेट काढले. विशेषे म्हणजे त्याच स्पर्धेत त्याने 19 षटकार मारले होते.
advertisement
7/7
प्रशांतची हीच वीरता पाहून चेन्नई सुपर किंग्जने त्याला ताफ्यात घेतलं होतं.विशेष म्हणजे नुसतं त्याला ताफ्यात घेतलं नाही तर त्याच्यासाठी सर्वाधिक 14 कोटी 20 लाख मोजले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
CSK ने उगाच 14 कोटी नाही मोजले! कॅच पकडताना गंभीर इजा, 7 टाके बसले तरी पठ्ठ्याने मैदान सोडलं नाही,कोण आहे खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल