T20 वर्ल्ड कपनंतर 5 दिग्गज घेणार निवृत्ती, टीम इंडियाचा स्टारही करणार करिअरचा शेवट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. एकूण 20 टीम या स्पर्धेत सहभागी होतील, ज्यासाठी बऱ्याच देशांची त्यांची 15 सदस्यीय टीम जाहीर केली आहे. या टी-20 वर्ल्ड कपनंतर 5 दिग्गज खेळाडू निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने टेस्ट क्रिकेटमधून जवळपास निवृत्ती घेतली आहे. जानेवारी 2019 मध्ये त्याने शेवटची टेस्ट खेळली होती. टी-20 वर्ल्ड कपनंतर रशीदचं वय 38 वर्ष होईल, त्यामुळे तो निवृत्त होऊ शकतो.
advertisement
2/6
मार्कस स्टॉयनिसने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. टी-20 आणि फ्रॅन्चायजी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्टॉयनिसने हा निर्णय घेतला. टी-20 वर्ल्ड कपनंतर स्टॉयनिस 36 वर्षांचा होईल, त्यामुळे तोदेखील निवृत्त व्हायचा विचार करू शकतो.
advertisement
3/6
कुसल परेरा श्रीलंकेच्या टीमचा विश्वासू बॅटर आहे. परेराच्या आक्रमक बॅटिंगमुळे श्रीलंकेला जलद सुरूवात मिळते, पण मागच्या काही काळापासून कुसल परेराचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्येही परेराची कामगिरी अशीच राहिली, तर त्याला टीमबाहेर केलं जाऊ शकतं.
advertisement
4/6
वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्सची कामगिरीही निराशाजनक झाली आहे. सीपीएल 2025 मध्ये त्याने 10 इनिंगमध्ये फक्त 212 रन केले. 35 वर्षांच्या जॉनसन चार्ल्सची टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली, तरीही त्याचं करिअर स्पर्धेनंतर संपण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
टीम इंडियाच्या स्टार बॉलरचाही या यादीत समावेश होऊ शकतो. जसप्रीत बुमराहचं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण तो फक्त 32 वर्षांचा आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
बुमराह भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर दुखापतीचा इतिहास बघता बुमराह इंटरनॅशनल टी-20 क्रिकेटला अलविदा करू शकतो. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बुमराह भारताच्या विजयाचा शिल्पकार होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपनंतर 5 दिग्गज घेणार निवृत्ती, टीम इंडियाचा स्टारही करणार करिअरचा शेवट!