WTC जिंकण्यासाठी नव्या हेड कोचची गरज? गंभीरची आकडेवारी पाहून डोक्याला हात लावाल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir Coaching Performance : टीम इंडियाच्या मागील तीन प्रशिक्षणाच्या आकडेवारीनुसार, गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात भारतीय कसोटी टीमच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या राजीनाम्याची मागणी होतीये.
advertisement
1/5

मागील दोन यशस्वी प्रशिक्षक, राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्या तुलनेत गंभीर यांच्या नेतृत्वाखालील 'विन-लॉस रेशो' खूपच कमी आहे, ज्यामुळे संघव्यवस्थापनाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement
2/5
राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात टीम इंडियाचा विन-लॉस रेशो 2.00 इतका दमदार होता. याचा अर्थ, त्यांनी हरलेल्या प्रत्येक मॅचमागे दोन मॅचेस जिंकल्या होत्या. तर रवी शास्त्री यांच्या काळात हा रेशो 1.92 होता.
advertisement
3/5
या तुलनेत, गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली हा रेशो थेट 0.77 पर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ, त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक मॅचमागे टीमने जवळपास एक मॅच गमावली आहे.
advertisement
4/5
गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीमने केवळ 18 कसोटी मॅचेस खेळल्या आहेत, पण त्यात 9 सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. तर 7 सामन्यातच विजय मिळवता आलाय.
advertisement
5/5
याउलट, रवी शास्त्री यांनी 43 मॅचेस खेळल्यानंतर केवळ 13 मॅचेस गमावल्या होत्या. म्हणजे गंभीर यांच्या कार्यकाळात कमी मॅचेस खेळूनही पराभवाचे प्रमाण खूप जास्त आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दबदबा कमी होताना दिसतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WTC जिंकण्यासाठी नव्या हेड कोचची गरज? गंभीरची आकडेवारी पाहून डोक्याला हात लावाल!