Glenn Maxwell: 'विराटनं करियर वाचवलं पण सेहवागनं तर माझं...', ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Glenn Maxwell: सेहवागनं घाणेरडं राजकारण केलं, पण विराटनं...ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा
advertisement
1/9

ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार आणि ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने टीम इंडियाचा खेळाडूंबाबर धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने आपल्या पुस्तक प्रकाशनावेळी हा खुलासा केला आणि आपल्या मनातली सल त्याने बोलून दाखवली. शोमॅन असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. त्याने जे सांगितलं ते ऐकून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
advertisement
2/9
टीम इंडियाच्या एका खेळाडूनं करियर वाचवलं तर एका माजी खेळाडूकडून घाणेरडं राजकारण करण्यात आलं असं मॅक्सवेल म्हणाला. आयपीएलदरम्यान पंजाब किंग्सकडून खेळताना वीरेंद्र सेहवागने दिलेल्या वागणुकीवर आणि त्याने केलेल्या राजकारणाबाबत मॅक्सवेलनं खुलासा केला आहे.
advertisement
3/9
मॅक्सवेल 2014 ते 2017 पंजाब किंग्स संघाकडून आयपीएलसाठी खेळला होता. 2014 मध्ये त्याने 187 च्या स्ट्राइकरेटने 552 धावा केल्या होत्या. टीमला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. 2017 रोजी मॅक्सवेलकडे टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचवेळी वीरेंद्र सेहवाग पंजाब किंग्सचा मेंटॉर म्हणून आला.
advertisement
4/9
मॅक्सवेलने 13 इनिंगमध्ये 310 धावा केल्या होत्या. टीममधील खेळाडूंची कामगिरी कमी पडली. त्यामुळे या सीरिजमध्ये त्याने 14 पैकी सात सामने जिंकवून दिले, मात्र टीम प्लेऑफपर्यंत पोहोचू शकली नाही. अरुण कुमार फक्त नावालाच प्रशिक्षक होते. त्यावेळी टीम पूर्ण सेहवाग चालवत होता. टीममधील खेळाडू नेमकं काय सुरू आहे विचारायचे, मात्र मला त्यावेळी तिथे त्यांना उत्तर देता आलं नाही.
advertisement
5/9
टीमला कसं पुढे घेऊन जाता येईल याची चर्चा करण्यासाठी प्रशिक्षकांचा Whatsapp ग्रूप तयार करुन चर्चा करू शकतो, अशी कल्पना मॅक्सवेलनं मांडली. मात्र सेहवागने ही कल्पना फेटाळून लावली. इतकंच नाही तर रायझिंग सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब सामन्यात अवघ्या 73 धावांत सामना संपला. त्यावेळी पत्रकार परिषदेतही सगळ्या चुकांचं खापर माझ्या एकट्यावर फोडण्यात आलं.
advertisement
6/9
त्या पत्रकार परिषदेनंतर मी सेहवागला मेसेज केला आणि मला वाईट वाटल्याचं स्पष्ट सांगितलं. ते शेवटचं संभाषण त्यानंतर मी आणि सेहवाग पुन्हा कधीच बोललो नाही. त्याच दिवशी सेहवागबद्दल आदर आणि त्याला आदर्श मानणं बंद केलं. सेहवागनंही मला तुझ्यासारखा चाहता नकोय असं उत्तर दिल्याने मॅक्सवेल जास्त दुखावला गेला. त्यामुळे मॅक्सवेलनं कायमचं बोलणं बंद केल्याचं सांगितलं.
advertisement
7/9
मॅक्सवेल तीन वर्षांनंतर 2020 मध्ये पंजाब किंग्जमध्ये परतला, सेहवागने दोन वर्षांपूर्वी संघ सोडला होता. दुर्दैवाने, मॅक्सवेलचा फ्रँचायझीसह दुसरा निराशाजनक कार्यकाळ होता, ज्यामुळे त्याची 2021 मध्ये त्याचा करार रद्द केला.
advertisement
8/9
बंगळुरू टीमने मॅक्सवेलची कामगिरी पाहून त्याला आपल्या संघात घेतलं. 2023 ची आयपीएल स्पर्धा RCB साठी खूपच कठीण आणि वाईट काळ ठरली, त्यावेळी पुन्हा एकदा सेहवागने त्याच्यावर टीका केली.
advertisement
9/9
खराब कामगिरी असूनही बिनधास्त आयुष्य मॅक्सवेल जगत आहे असं सेहवाग म्हणाला. त्यांच्यातील हा वाद सध्या तरी मिटल्याचं समोर आलं नाही. पण बंगळुरूमध्ये संधी मिळाल्याने विराटनं मॅक्सवेलचं करियर वाचवलं असंही तो म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Glenn Maxwell: 'विराटनं करियर वाचवलं पण सेहवागनं तर माझं...', ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा