Vaibhav Suryavanshi : 6,6,6,6,6,6,6,6... फक्त सिक्स मारून अर्धशतक ठोकलं, वैभवच्या वादळाचा आफ्रिकेला तडाखा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वैभव सूर्यवंशीच्या वादळी बॅटिंगचा तडाखा आता दक्षिण आफ्रिकेला बसला आहे. वैभव सूर्यवंशीने सिक्सच्या मदतीने एकही फोर न मारता अर्धशतक ठोकलं आहे.
advertisement
1/5

अंडर-19 यूथ वनडे सीरिजच्या दुसऱ्या सामन्यात 14 वर्षांच्या वैभवने फक्त 19 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी वैभवने एकही फोर मारली नाही. 8 सिक्सच्या मदतीने वैभवने 48 रन काढले आणि दोनवेळा एक-एक रन घेऊन 50 रन पूर्ण केल्या.
advertisement
2/5
वैभव सूर्यवंशी वादळी शतक झळकावेल असं वाटत होतं, पण 24 बॉलमध्ये 68 रन करून वैभव आऊट झाला, यात त्याने 10 सिक्स आणि 1 फोर मारली. वैभवने 283.33 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
advertisement
3/5
याआधी दक्षिण आफ्रिकेचा पहिले बॅटिंग करताना 49.3 ओव्हरमध्ये 245 ऑलआऊट झाला. आयुष म्हात्रेच्या गैरहजेरीमध्ये वैभव सूर्यवंशी भारतीय टीमचं नेतृत्व करत आहे. मागच्या सामन्यात वैभव 12 बॉलमध्ये 11 रन करून आऊट झाला.
advertisement
4/5
वैभव सूर्यवंशीने इनिंगच्या आठव्या ओव्हरमध्ये मीडियम फास्ट बॉलर बयांडा मजोला याला लागोपाठ 3 सिक्स आणि चौथ्या बॉलवर फोर मारली. शेवटच्या दोन बॉलवर वैभवला रन काढता आली नाही, पण तरीही या ओव्हरमध्ये एकूण 22 रन आल्या.
advertisement
5/5
याआधी सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 25 रननी पराभव केला होता. आता या सामन्यातही त्यांचा पराभव झाला तर टीम इंडिया 2-0 ने विजयी आघाडी घेईल. सीरिजचा शेवटचा सामना 7 जानेवारीला होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 6,6,6,6,6,6,6,6... फक्त सिक्स मारून अर्धशतक ठोकलं, वैभवच्या वादळाचा आफ्रिकेला तडाखा!