TRENDING:

अरे देवा! हे काय झालं? iPhone16 घेतल्याचा आनंद, पराठे खाण्याची इच्छा आणि 3 मित्रांचा मृत्यू

Last Updated:
Accident News : 3 मित्रांपैकी एकाने आयफोन16 घेतला आणि तिघांचाही आनंद गगनात मावेना. आयफोन घेतल्याचा आनंद साजरा करायला निघाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
1/5
हे काय झालं? आयफोन16 घेतल्याचा आनंद, पराठे खाण्याची इच्छा आणि 3 मित्रांचा मृत्यू
आपल्याकडे आयफोन असावा असं कित्येकांना वाटतं. पण आयफोन प्रत्येकाला परवडणारा नाही. त्यामुळे आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडे जरी आयफोन असेल तर त्याचं कौतुक वाटतं. असेच तीन मित्र त्यापैकी एकाने आयफोन घेतला आणि तिघांनाही याचा आनंद झाला. पण आयफोन घेतल्याचा हाच आनंद या तिन्ही मित्रांच्या जीवावर बेतला आहे.
advertisement
2/5
दिल्लीतील कृष्णा विहार येथील मयंक,  दीपक आणि तुषार ज्याला प्रतीक म्हणूनही ओळखलं जातं हे तीन मित्र. प्रतीकने आयफोन 16 घेतला. आता मित्राने आयफोन घेतला म्हणजे पार्टी तर हवीच. तिघांनी पार्टी करायचं ठरवलं.
advertisement
3/5
दिल्लीहून ते हरयाणाच्या मुर्थल येथील एका ढाब्यावर पार्टी करायची ठरली. मुर्थल इथं पराठा खायला ते निघाले. तिघंही एकाच स्कूटीरवरून निघाले. जेव्हा ते नांगल खुर्द उड्डाणपुलावर पोहोचले तेव्हा त्यांची स्कूटर एका ट्रेलरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की स्कूटरचा चक्काचूर झाला आणि तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले.
advertisement
4/5
राष्ट्रीय महामार्ग (NH)-44 वरील नांगल खुर्द या गावातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण  अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले. पण मयंक आणि दीपक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रतीक जिवंत होता. त्याला मुरथळ रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याचाही तिथं मृत्यू झाला. मुरथळ पोलीस ठाण्याने तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. खूप प्रयत्नांनंतर मृतदेहांची ओळख पटली.
advertisement
5/5
अजय नावाच्या नातेवाईकाने सांगितलं की, प्रतीकने नवीन आयफोन खरेदी केला होता आणि त्याची पार्टी करायला ते निघाले होते. अपघातानंतर तपास अधिकारी एएसआय सुशील कुमार यांनी सांगितले की, स्कूटर ट्रकला धडकल्याची माहिती मिळाली होती. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलं नव्हतं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
अरे देवा! हे काय झालं? iPhone16 घेतल्याचा आनंद, पराठे खाण्याची इच्छा आणि 3 मित्रांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल