TRENDING:

IND vs SA 2nd ODI : साऊथ अफ्रिकेचे 4 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन!

Last Updated:
IND vs SA 2nd odi playing xi prediction : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोणते चार खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात? जाणून घ्या
advertisement
1/6
साऊथ अफ्रिकेचे 4 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, पाहा कशी असेल टीम इंडिया?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवार, 3 डिसेंबर रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. टॉस दुपारी 1 वाजता होईल.
advertisement
2/6
पहिल्या एकदिवसीय सामन्यात, कर्णधारासह दक्षिण आफ्रिकेचे तीन आघाडीचे बॅटर फक्त 11 धावांवर आऊट झाले होते. त्यानंतर मॅथ्यू ब्रिट्झकेने साऊथ अफ्रिकेला विजयाच्या उंभरठ्यावर आणलं होतं. त्यामुळे तो दुसऱ्या मॅचमध्ये धोकादायक ठरू शकतो.
advertisement
3/6
टोनी डी झोर्झी देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 35 बॉलमध्ये 39 धावा केल्या. भारताविरुद्धच्या कसोटीतही त्याने चांगली फलंदाजी केली होती. मिडल ऑर्डरमध्ये तो घातक ठरू शकतो.
advertisement
4/6
मार्को यानसेन साऊथ अफ्रिकेसाठी हुकमी एक्का ठरतोय. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 93 धावांची धमाकेदार खेळी केली आणि 7 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तसेच पहिल्या वनडेमध्ये त्याने नाकात दम केला होता.
advertisement
5/6
कॉर्बिन बॉशने 51 बॉलमध्ये चार सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 67 धावा काढत दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरपर्यंत सामन्यात रोखलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये तो कॅचआऊट झाला असला तरी त्याच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केलं.
advertisement
6/6
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, नीतीश कुमार रेड्डी/वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (C), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA 2nd ODI : साऊथ अफ्रिकेचे 4 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल