IPL 2026 Auction : BCCI चा मोठा निर्णय, ऑक्शनआधी आयपीएलमधून 3 खेळाडू बॅन, नेमकी चूक काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 16 डिसेंबर 2025 ला अबुधाबीमध्ये आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार आहे. यामध्ये एकूण 1355 खेळाडूंनी नोंदणी केली असून 77 स्लॉटसाठी बोली लागणार आहे.यापैकी 31 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
advertisement
1/6

या स्पर्धेआधी काही स्टार खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे, तर काही खेळाडूंना बीसीसीआयने बॅन केले आहे.हे खेळाडू नेमके कोण आहेत? आणि त्यांच्यावर कठोर कारवाई का करण्यात आली? हे जाणून घेऊयात.
advertisement
2/6
खरं तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावपूर्वी बीसीसीआयने विदेशी खेळाडूंवर काही नियम लागू केले आहेत. जसे लिलावापूर्वी विदेशी खेळाडूंना नोंदणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या खेळाडूने नोंदणी केली नाही तर तो पुढील हंगामाच्या लिलावातून बाहेर होतो.
advertisement
3/6
दुखापत किंवा वैद्यकीय कारणाशिवाय जर एखादा खेळाडू विकत घेतल्यानंतर ही हंगामा सूरू होण्यापूर्वी माघार घेत असेल तर त्याला दोन हंगामासाठी बंदी घालण्यात येते.
advertisement
4/6
इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गेल्या मेगा लिलावात नोंदणी करू शकला नाही.कारण तो त्याच्या फिटनेस आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला प्राधान्य देऊ इच्छित होता.म्हणूनच त्याने आयपीएल 2026 मिनी लिलावातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडला.
advertisement
5/6
इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी ब्रुकने आजीच्या निधनामुळे 2024च्या आयपीएलमधून माघार घेतली होती. 2025मध्ये, त्याला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटींना खरेदी केले होते.परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने माघार घेतली.पण आता बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागेल.
advertisement
6/6
इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉयचे देखील आहे. जेसन रॉयने देखील वैयक्तिक कारणांमुळे या नियमांचे उल्लंघन केले. त्याने आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतले. तो आता आयपीएल 2026 मिनी लिलावात दिसणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : BCCI चा मोठा निर्णय, ऑक्शनआधी आयपीएलमधून 3 खेळाडू बॅन, नेमकी चूक काय?