Kl Rahul Century : शतक ठोकताच बॅट उंचावली,तोंडात बोट घातलं अन्..., राहुलच्या सेलिब्रेशनचा अर्थ काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचे 118 वर 4 विकेट पडल्यानंतर राहुल फलंदाजीला आला होता.यावेळी त्याने शेवटपर्यंत एकट्याने झूंज देऊन टीम इंडियाचा डाव 284 पर्यंत नेला होता.
advertisement
1/8

राजकोटच्या मैदानात सूरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा डाव गडगडला होता. पण यावेळी संकटमोचक बनून केएल राहुल मैदानात आला होता.
advertisement
2/8
टीम इंडियाचे 118 वर 4 विकेट पडल्यानंतर राहुल फलंदाजीला आला होता.यावेळी त्याने शेवटपर्यंत एकट्याने झूंज देऊन टीम इंडियाचा डाव 284 पर्यंत नेला होता.
advertisement
3/8
के एल राहुलने यावेळी एकट्याने 92 बॉलमध्ये 112 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 11 चौकार आणि एक षटकार मारला होता.
advertisement
4/8
केएल राहुलचं हे वनडे क्रिकेटमधलं आठव शतक होतं. हे शतक ठोकल्यानंतर राहुलने बॅट उंचावली आणि तोंडात बोट घालून सेलीब्रेशन केलं होतं.हे शतक राहुलने त्याच्या मुलीला डेडिकेट केलं आणि लहान मुलांसारखं तोंडात बोट घालून सेलीब्रेशन केलं.
advertisement
5/8
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली होती.कारण रोहित-गिलच्या सलामी जोडीने 70 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित 24 वर तर गिल 56 धावांवर बाद झाला होता.
advertisement
6/8
ज्यावेळेस गिल बाद झाला त्यावेळेस भारताच्या 99 वर 2 विकेट होते. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आले होते. हे दोघेही भारताचा डाव सावरतील असे वाटत होते. पण दोघेही म्हणजेच विराट 23 वर तर श्रेयस अय्यर 8 वर बाद झाला होता.
advertisement
7/8
त्यामुळे भारताचे 119 वर 4 विकेट पडले होते.त्यानंतर राहुल आणि रविंद्र जडेजा मैदानात आला. राहुल ज्यावेळेस मैदानात आला तेव्हा 24 वी ओव्हर सूरू होती. त्यानंतर जडेजा 27 वर बाद झाला. नंतर राहुलने एकट्याने पुढच्या 26 ओव्हर खेळून काढत 112 धावांची खेळी केली. ज्यामुळे टीम इंडिया 284 पर्यंत मजल मारू शकली होती.
advertisement
8/8
न्यूझीलंडकडून क्रिस्टन क्लार्कने सर्वाधिक 3, कायली जेमिन्सन आणि मिचेल ब्रेसवेलने आणि झकारी फोल्कस प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Kl Rahul Century : शतक ठोकताच बॅट उंचावली,तोंडात बोट घातलं अन्..., राहुलच्या सेलिब्रेशनचा अर्थ काय?