Prithvi Shaw : दुसऱ्यांदा UNSOLD राहिल्याने पृथ्वी शॉचा हार्टब्रेक, सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अबुधाबीमध्ये आयपीएल 2026चा लिलाव सूरू आहे. या लिलावात अनकॅप्ड खेळाडू भाव खाऊन गेले आहेत, तर स्टार खेळाडूंच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत.
advertisement
1/8

अबुधाबीमध्ये आयपीएल 2026चा लिलाव सूरू आहे. या लिलावात अनकॅप्ड खेळाडू भाव खाऊन गेले आहेत, तर स्टार खेळाडूंच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत.
advertisement
2/8
या खेळाडूंमध्ये मुंबईच्या पृथ्वी शॉचा आणि सरफराज खानचा देखील नंबर लागतो आहे. हे दोन्हीही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतायत. तरी देखील त्यांना यंदा कुणीच खरेदी केले नाही.
advertisement
3/8
पृथ्वी शॉ आणि सरफराज खान या दोघांची बेस प्राईज ही 75 लाख होती. या दोघांची देशांतर्गत कामगिरी पाहता त्यांना मोठी बोली लागले असे वाटले होते. पण तसे अजिबात घडले नाही आहे.
advertisement
4/8
दरम्यान आता आयपीएल 2026 मध्ये अनसोल्ड राहिल्याने पृथ्वी शॉचा हार्टब्रेक झाला आहे. यानंतर त्याने भावूक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
5/8
तुम्ही सगळं बघताय ना साई बाबा, अशी पोस्ट पृथ्वी शॉने केली आहे. या पोस्टचा पृथ्वी शॉच्या आयपीएलमधील अनसोल्ड राहण्याशी संबंध आहे.
advertisement
6/8
पृथ्वी शॉने यावर्षी मुंबई सोडून महाराष्ट्र संघात प्रवेश केला होता. यावेळी रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने 7 डावांमध्ये 470 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने चंदिगडविरूद्द 222 धावांची खेळी केली होती.तसेच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने 36 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली होती.
advertisement
7/8
पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षापासून आपल करीअर योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत घेतो आहे.
advertisement
8/8
दरम्यान इतकी मेहनत घेऊन देखील त्याला संधी मिळत नाही आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ प्रचंड खचलेला दिसतो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : दुसऱ्यांदा UNSOLD राहिल्याने पृथ्वी शॉचा हार्टब्रेक, सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट