CSK च्या कॅप्टनसोबत धोका, आर आश्विन भांडायला उठला! पोस्ट करत BCCI वर शब्दांचा वार
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
R Ashwin On Ruturaj Gaikwad : इतका शानदार फॉर्म असूनही ऋतुराज गायकवाडला संधी न मिळाल्याने गौतम गंभीर आणि अजित अगरकर यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.
advertisement
1/7

शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 11 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. या मॅचसाठी संघात श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून परतला आहे.
advertisement
2/7
मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये 105 धावांची जबरदस्त इनिंग खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला डच्चू देण्यात आला.
advertisement
3/7
केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तराखंड विरुद्ध त्याने 124 धावांची खेळी केली होती. इतका शानदार फॉर्म असूनही त्याला संधी न मिळाल्याने गौतम गंभीर आणि अजित अगरकर यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.
advertisement
4/7
माजी खेळाडू रविचंद्रन अश्विन याने देखील या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ऋतुराजचा फोटो शेअर करत म्हटले की, सध्याची परिस्थिती स्वीकारणे कठीण असले तरी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही स्पर्धा अटळ आहे, असं म्हटलं आहे.
advertisement
5/7
तुला काय वाटतंय याने काही फरक पडत नाही. उठ उभा रहा, जर्सी घाल आणि पॅड पायाला बांध पण कधी हार मानू नको, असं आश्विन म्हणाला आहे.
advertisement
6/7
तू इतका चांगला खेळलास की तुला दुर्लक्षित करणं कठीण आहे, पण भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धाच इतकी तीव्र आहे, असं आश्विन म्हणाला.
advertisement
7/7
भारतीय संघ: शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (व्हॉइस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
CSK च्या कॅप्टनसोबत धोका, आर आश्विन भांडायला उठला! पोस्ट करत BCCI वर शब्दांचा वार