अखेरच्या क्षणी Shikhar Dhawan ची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एन्ट्री, थेट ICC ने केली घोषणा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shikhar Dhawan In Champions Trophy : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एन्ट्री झाली आहे. अखेरच्या क्षणी आयसीसीने याची घोषणा केली. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
advertisement
1/7

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र, भारताने विरोध दर्शवल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल. अशातच मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. येत्या 19 फेब्रुवारीपासून या सामन्यांना सुरूवात होईल.
advertisement
3/7
तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधील इतर 7 संघ रावळपिंडी, लाहोर आणि कराचीमध्ये खेळणार आहेत. अशातच आता टीम इंडियाच्या माजी खेळाडूची अचानक चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एन्ट्री झालीये.
advertisement
4/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून शिखर धवन आहे. आयसीसीने शिखर धवन याची इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आयसीसीने नुकतीच याची घोषणा केली आहे.
advertisement
5/7
आयसीसीने इव्हेंट ॲम्बॅसेडर एकूण चौघांची नावं जाहीर केली. याच ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी आणि पाकिस्तानच्या सरफराज खान याचा समावेश करण्यात आलाय.
advertisement
6/7
चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग होणं ही खास भावना आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत ॲम्बॅसेडर म्हणून सामन्याचा आनंद घेणं हा मोठा सन्मान असल्याचं शिखर धवन याने म्हटलं आहे.
advertisement
7/7
माझ्यसााठी ही खास स्पर्धा आहे. माझ्या या स्पर्धेसह अनेक आठवणी आहेत, असं म्हणत शिखर धवनने आठवणींना उजाळा दिला. तुम्हाला माहिती नसेल तर शिखरने दोनवेळा टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
अखेरच्या क्षणी Shikhar Dhawan ची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एन्ट्री, थेट ICC ने केली घोषणा!