Smriti Mandhana : लग्न मोडलं पण हिंमत हारली नाही! पहिल्याच मॅचमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana New Record : लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या स्मृतीने टी-ट्वेंटीमध्ये नवा विक्रम रचला आहे. स्मृतीने 4000 धावा पूर्ण केल्या.
advertisement
1/5

वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया नव्या ध्येयासह मैदानात उतरली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला गेला. यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे.
advertisement
2/5
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने देखील आपली जादू कायम ठेवली. टीम इंडियाने हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. जेमिमा रॉड्रिक्स या सामन्याची हिरो ठरली.
advertisement
3/5
श्रीलंकेविरुद्ध 122 धावांचं आव्हान पार करताना स्मृतीने 25 धावांची खेळी केली. यावेळी तिने एक मोठा रेकॉर्ड रचला आहे. स्मृतीने यावेळी 4000 धावांचा टप्पा पार केला.
advertisement
4/5
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारी स्मृती मानधना ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. स्मृतीने आता 154 सामन्यांमध्ये एकूण 4008 धावा आहेत.
advertisement
5/5
स्मृती मानधना ही टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडणारी दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. या यादीत न्यूझीलंडची सुझी बेट्स अव्वल स्थानावर आहे, जिच्या नावावर 4716 धावांचा विश्वविक्रम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : लग्न मोडलं पण हिंमत हारली नाही! पहिल्याच मॅचमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय