TRENDING:

WTC Points Table : न्यूझीलंडच्या विजयानंतर दोन संघांना 'जोर का झटका', टीम इंडियासह गंभीरचाही बीपी वाढला!

Last Updated:
ICC World Test Championship 2027 Points Table : दुसरीकडे न्यूझीलंड 77.78 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 75 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी यापूर्वी भारताचा 2-0 असा पराभव केला होता.
advertisement
1/6
न्यूझीलंडच्या विजयानंतर दोन संघांना 'जोर का झटका', गंभीरचाही बीपी वाढला!
न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 323 रन्सनी धुव्वा उडवत कसोटी क्रिकेट मालिकेवर 2-0 ने कब्जा केला. या विजयासोबतच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये किवी संघाने दुसरं स्थान पटकावलंय.
advertisement
2/6
जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या 100 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर भक्कमपणे उभा आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सलग 6 मॅच जिंकून 72 पॉइंट्स मिळवले आहेत.
advertisement
3/6
दुसरीकडे न्यूझीलंड 77.78 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 75 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी यापूर्वी भारताचा 2-0 असा पराभव केला होता.
advertisement
4/6
सध्याची परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे तीन संघ या सायकलमध्ये अजूनही अपराजित आहेत. टीम इंडियासाठी मात्र ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
advertisement
5/6
घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघ आता 6 व्या क्रमांकावर घसरला आहे. भारताची सध्याची टक्केवारी 48.15 इतकी खाली आली आहे.
advertisement
6/6
तसेच इंग्लंडची अवस्था अधिक बिकट असून 8 मॅचपैकी 5 मॅच गमावल्यामुळे ते 7 व्या क्रमांकावर आहेत. कॅप्टन शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील आता आगामी मालिकांमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WTC Points Table : न्यूझीलंडच्या विजयानंतर दोन संघांना 'जोर का झटका', टीम इंडियासह गंभीरचाही बीपी वाढला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल