Thane : गंगा आरती सोहळ्याचे साक्षीदार व्हा! 31 डिसेंबरला तलावपाळीजवळ भव्य आयोजन; जाणून घ्या कसे पोहोचाल?
Last Updated:
Ganga Aarti Thane : 31 डिसेंबरला तलावपाळीजवळ भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाचे स्वागत भक्तीमय वातावरणात होणार आहे.
advertisement
1/7

सरत्या वर्षाला उत्साहात निरोप देत येत्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्याची परंपरा सर्वत्र असताना ठाण्यात मात्र यंदा सरते वर्ष आणि येणाऱ्या नववर्षाला भक्तिपूर्ण वातावरणात साजरे केले जाणार आहे.
advertisement
2/7
31 डिसेंबरच्या रात्री तलावपाळी जवळच्या काठावर गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून फटाक्यांच्या आवाजाऐवजी मंत्रोच्चार, दिव्यांचा उजेड आणि भक्तीमय वातावरणात ठाणेकरांना सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे शांतपणे स्वागत करता येणार आहे.
advertisement
3/7
सर्वत्रच वर्षा अखेरीस आणि येत्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ठाण्यात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने अनेक वर्षांपासून गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष उत्साहात साजरे केले जाते.
advertisement
4/7
शहरात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा या यात्रेचे 26 वे वर्ष आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तलावपाळीजवळ दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर गंगा आरती करण्याची परंपरा आहे.
advertisement
5/7
यंदा देखील या गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यावर्षी गंगा आरती गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला होणार नसून नववर्षाच्या पूर्वसंध्येला केली जाणार आहे. ही आरती रात्री 10.30 वाजता सुरू होऊन नूतन वर्षाच्या आगमनानंतर रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी संपन्न होणार आहे
advertisement
6/7
या ठिकाणी जायचे कसे तुम्हाला माहिती आहे का?नसेल तर खालील प्रमाणे पाहा. तलावपाळी हे ठाणे स्टेशनपासून अगदी 10 ते 5 मिनिट अंतरावर आहे. जिथे तुम्ही अगदी पायी चालतही जाणू शकता.
advertisement
7/7
यावेळी तलावाच्या भोवताली आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच तलावाच्या शांत पाण्यावर उमटणाऱ्या दिव्यांच्या प्रतिबिंबामुळे परिसर अधिकच रमणीय दिसणार आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Thane : गंगा आरती सोहळ्याचे साक्षीदार व्हा! 31 डिसेंबरला तलावपाळीजवळ भव्य आयोजन; जाणून घ्या कसे पोहोचाल?