TRENDING:

World Cup: सूर्याच्या फटकेबाजीने रोहित अन् राहुल द्रविडचं वाढलं टेन्शन, प्लेइंग- 11मधून कोणाला डच्चू?

Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने तीन एकदिवसीय सामन्यातील सलग दोन सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतलीय. दुसऱ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ७२ धावा केल्या. यामुळे आता भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड अन् कॅप्टन रोहित शर्मा यांचे टेन्शन वाढलेय.
advertisement
1/7
सूर्याच्या खेळीने रोहित अन् द्रविडचं वाढलं टेन्शन, प्लेइंग- 11मधून कोण बाहेर?
वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारत पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत खेळणार आहे. त्याआधी भारताची ऑस्ट्रेलिविरुद्ध तीन एकदिवसी सामन्यांची मालिका सुरू आहे. यात पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली. दोन्ही सामन्यात फलंदाजांनी कमाल केली. आता या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासमोर प्लेइंग इलेव्हनचा पेच आता निर्माण झाला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये ज्या फलंदाजांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलंय.
advertisement
2/7
सूर्यकुमार यादवला वर्ल्ड कपसाठी १५ जणांच्या संघात घेतलं आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी दाखवलेला विश्वास पाहता तो वर्ल्ड कपसाठी अंतिम संघातही असेल. पण प्लेइंग इलेव्हनचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहाली आणि इंदौरमध्ये त्याने केलेली फटकेबाजी पाहता भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसतायत.
advertisement
3/7
ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वर्षी मार्च महिन्यात सूर्यकुमार यादव सलग ३ सामन्यात खातं उघडता आलं नव्हतं. त्यानंतर सहा महिन्यातच त्याने चित्र बदललं. सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावली. यात त्याने तुफान फटकेबाजीही केली. विशेष म्हणजे सहाव्या क्रमांकावर येत त्याने ही कामगिरी केलीय.
advertisement
4/7
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार भारतीय संघ अडचणीत असताना आला. त्याने केएल राहुलसोबत डाव सावरला. त्यानंतर दीड वर्षांनी अर्धशतक केलं. मोहालीत तो सामना संपवू शकला नाही पण इंदौरमध्ये त्याने अखेरपर्यंत फलंदाजी केली.
advertisement
5/7
सूर्यकुमार यादव इंदौरमध्ये ४० व्या षटकात फलंदाजीला मैदानात आला. त्यानंतर टी२० मध्ये फटकेबाजी करावी तसी फलंदाजी करत फक्त ३७ चेंडूत ७२ धावा केल्या. यामुळे भारताची धावसंख्या ३९९ पर्यंत पोहोचली. कॅमेरून ग्रीनच्या एका षटकात ४ षटकारही मारले होते.
advertisement
6/7
आताची सूर्यकुमारची कामगिरी पाहता त्याला वर्ल्ड कपसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? जर मिळाले तर बाहेर कोण बसणार? असा प्रश्न आहे. सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. त्यातच आघाडीचे तीन फलंदाज निश्चित आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांची जागा नक्की आहे. तर श्रेयस अय्यरने शतक झळकावून चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी आपला दावा भक्कम केला. तर विकेटकिपर म्हणून केएल राहुलची जागा पक्की आहे. आता हार्दिक पांड्या अष्टपैलू म्हणून संघात आहे तर सूर्यकुमार यादवला संधी कशी मिळणार?
advertisement
7/7
सध्याचा संघ पाहता इशान किशनला सुर्यकुमार यादवसाठी संघातून बाहेर बसावं लागू शकतं. कारण केएल राहुलने आपली जागा पक्की केली आहे. पुनरागमनानंतर फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल दमदार कामगिरी करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
World Cup: सूर्याच्या फटकेबाजीने रोहित अन् राहुल द्रविडचं वाढलं टेन्शन, प्लेइंग- 11मधून कोणाला डच्चू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल