पृथ्वीच्या लाईनवर चालला जयस्वाल? निवड समितीने फोन केला, पण... सिलेक्शन न व्हायचं शॉकिंग कारण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताच्या टेस्ट टीमचा नियमित ओपनर यशस्वी जयस्वाल याची भारताच्या वनडे आणि टी-20 टीममध्ये निवड होत नाही. टी-20 वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्येही यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आलेली नाही.
advertisement
1/7

रणजी ट्रॉफीच्या दिल्लीविरुद्धच्या लीग स्टेजमधल्या शेवटच्या सामन्यासाठी मुंबईने टीमची घोषणा केली आहे. मुंबईच्या टीममध्ये ओपनर यशस्वी जयस्वालला संधी मिळालेली नाही.
advertisement
2/7
जयस्वाल भारताच्या टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्येही नाही, त्यामुळे तो मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने जयस्वालबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.
advertisement
3/7
मागचा सामना आणि या सामन्याआधी टीम निवडताना आम्ही यशस्वी जयस्वालसोबत संपर्क साधला होता, पण आम्हाला काहीही उत्तर मिळालं नाही, त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सिलेक्शनसाठी त्याचा विचार झाला नाही, असं एमसीएच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.
advertisement
4/7
यशस्वी जयस्वालने काही काळापूर्वी मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता, यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसीही मागितलं होतं. मुंबई सोडून जयस्वाल गोव्याकडून खेळणार होता, पण जयस्वालने त्याचा हा निर्णय बदलून मुंबईकडूनच खेळणं कायम ठेवलं.
advertisement
5/7
24 वर्षांचा यशस्वी जयस्वाल भारतीय टेस्ट टीमचा नियमित ओपनर आहे. 28 सामन्यांमध्ये त्याने 49 च्या सरासरीने 2511 रन केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 7 शतकं आणि 13 अर्धशतकं केली आहेत.
advertisement
6/7
जयस्वालच्या नावावर वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट शतकं आहेत, तसंच त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये दोनदा द्विशतकं केली आहेत.
advertisement
7/7
मुंबईची टीम : सिद्धेश लाड (कर्णधार), मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सुवेद पारकर, सरफराज खान, आकाश आनंद (विकेट कीपर), हार्दिक तामोरे (विकेट कीपर), सूर्यांश शेडगे, साईराज पाटील, शम्स मुलानी, हिमांशू सिंग, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओंकार तरमाळे, सिल्व्हेस्टर डिसुझा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
पृथ्वीच्या लाईनवर चालला जयस्वाल? निवड समितीने फोन केला, पण... सिलेक्शन न व्हायचं शॉकिंग कारण!