TRENDING:

Success Story : 16 व्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून मारहाण, आयुष्य संपवण्यापर्यंत पोहोचली, अन् एका गोष्टीनं बदललं आयुष्य

Last Updated:
Success Story : सविता प्रधान यांनी जे सोसलं ते कुणाच्याच वाट्याला येऊ नये! प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी त्यांची ही कहाणी वाचलीच पाहिजे
advertisement
1/12
16 व्या वर्षी लग्न,सासरच्यांकडून मारहाण,आयुष्य संपवण्यापर्यंत पोहोचली अन्...
एका आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सविता प्रधान यांच्या आयुष्याचा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणेची मशाल आहे. गरिबी, सामाजिक रूढीवाद आणि वैयक्तिक छळ यावर मिळवलेला एक मोठा विजय आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून बाहेर पडून त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर समाजाचेही भविष्य बदलून टाकले. मध्य प्रदेशातील सविता प्रधान यांचा जन्म एका गरीब आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अतिशय कष्टात गेले.
advertisement
2/12
सकाळी उठल्यावर त्यांचे पहिले काम असायचे ते महुआ वेचणे आणि विडीच्या पानांची तोडणी करणे. कुटुंबातील इतर सदस्यही याच कामात दिवसभर व्यस्त असायचे. जशा त्या मोठ्या होत गेल्या, तसतशी त्यांची शिक्षणाची भूक वाढू लागली. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. सविताने गावात राहून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. ही छोटीशी वाटणारी पण मोठी कामगिरी करणारी ती आपल्या गावची पहिली मुलगी ठरली. या यशानंतर मात्र, त्यांच्या आयुष्यात नियतीने दुसरी परीक्षा ठेवली होती. लवकरच त्यांचे लग्न झाले आणि येथूनच त्यांच्या संघर्षाच्या एका नव्या कथेला सुरुवात झाली.
advertisement
3/12
सविता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. गरिबीमुळे आर्थिक स्थिती चांगली नसतानाही त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत असे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर गावपासून ७ किमी दूर असलेल्या कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यांचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते. सविताचे आई-वडील शिकलेले नव्हते, पण मुलीला शिक्षणासाठी ते नेहमीच प्रोत्साहन देत राहिले. मात्र, सविता जेव्हा १२ वी मध्ये होत्या, तेव्हा एका श्रीमंत कुटुंबाकडून त्यांच्यासाठी मागणी आली.
advertisement
4/12
आई-वडील या चांगल्या नात्याला नकार देऊ शकले नाहीत आणि त्यांनी मुलीला लग्नासाठी राजी केले. अशा प्रकारे अवघ्या १६ वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांचा विवाह झाला. जिथे त्यांचे चांगले दिवस सुरू होतील अशी अपेक्षा होती, तेथून त्यांच्या आयुष्यातील कठीण आणि वाईट दिवसांना सुरुवात झाली, असे सविता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
advertisement
5/12
ज्याच्याशी माझं लग्न ठरवलं होतं तो माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठा होता. जेव्हा मला पहिल्यांदा पाहायला आला तेव्हा तो माझ्यावर जोरात ओरडला. तेव्हा मला पहिल्यांदी असं वाटलं की मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. मी घरात स्पष्ट सांगितलं, तरी मला घरांची दबाव आणून त्याच्याशी दुसऱ्या दिवशी साखरपुडा केला आणि एक महिन्याने लग्न केलं. भोपाळमध्ये मोठा रिसेप्शन सोहळा पार पडला खरा, पण या लग्नानंतर सविता बालविवाहाचा दंश सहन करू लागल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सासू, सासरे, नणंद आणि पतीने त्यांना खूप त्रास दिला, त्यांचा छळ केला. त्या दिवसांची आठवण येताच आजही त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात.
advertisement
6/12
सविता म्हणतात, मला त्यावेळी फार समजत नव्हतं. मला तिथे नोकरासारखं वागवलं जात होतं. घरातलं सगळं काम करायला लावयाचे, त्यानंतर मारहाण आणि सतत पावलो पावली अपमान करायचे. तिथे ना झोपायला द्यायचे, ना खायला द्यायचे, ना मला स्वत:चं स्वातंत्र नव्हतं. खाली मान घालून मला बोलावं लागायचं, इतकी वाईट परिस्थिती होती. जेवण उरलं तर मी जेवायचे, नाहीतर उपाशी झोपायचं इतके भयंकर दिवस काढले. मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला या घरात नाही राहायचं, मात्र माझे वडिल मला घ्यायला आलेच नाहीत. त्यानंतर मला समजलं, की मला वाचवायला कोणी येणार नाही. जे काही करायचं ते मलाच करायचं आहे.
advertisement
7/12
एक वेळ वाटलं की सगळ्यांना मारुन टाकावं, एकदा वाटलं की स्वत:ला संपवून टाकावं. सतत वेगवेगळे विचार डोक्यात येत होते. त्याच दरम्यान माझी तब्येत खूप जास्त खराब झाली. मी नवऱ्याला सांगितलं की बरं वाटत नाही, त्याने मला एक औषध आणून दिलं. त्याने मी बेशुद्ध झाले आणि संपूर्ण शरीर सुन्न झाल्यासारखं झालं. मी माझ्या वडिलांना सांगितलं. मात्र त्याने मला पुन्हा तब्येत बरी झाल्यानंतर घरी आणून सोडलं.
advertisement
8/12
त्यानंतर मला दोन मुलं झाली मात्र आयुष्याची परीक्षा संपली नव्हती. शेवटी सगळं संपवायचं ठरवलं. मात्र मनात होतं की चुकीचा निर्णय घेतोय हे वाटत होतं. मला माझ्या सासूने पाहिलं, मात्र मला थांबवण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला की या लोकांसाठी मी का माझं आयुष्य संपवतेय. मी काय वाटेल ते करेन पण इथे राहणार नाही या लोकांसाठी आयुष्य संपवणार नाही.
advertisement
9/12
मी कपडे भांडी करेन, कोणतंही काम करेन, वेळ पडली तर वेश्येचंही काम करेन रेल्वे स्थानकात झोपेन, मात्र इथे राहणार नाही हा विचार मनात पक्का झाला. दोन मुलांना घेऊन मी घराबाहेर पडले. त्यावेळी माझी आई माझ्यामागे उभी राहिली. तिने मला पार्लरमध्ये नोकरी दिली. छोटी कामं करुन उदरनिर्वाह करायला सुरू केला. शिलाईचं काम सुरू केलं आणि लहान मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं. त्यासोबत स्वत:ही अभ्यासाला सुरुवात केली.
advertisement
10/12
या छळामुळे त्यांचे जीवन इतके दुःखी झाले होते की, त्यातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण नंतर त्यांनी तो विचार कायमचा टाळला. त्यांना दोन मुले झाली. अखेरीस, त्यांनी हे दुःखी जीवन सोडून माहेरचा आधार घेतला आणि सासरचा त्याग केला. सासर सोडल्यानंतर सविता प्रधान एका नातेवाईकाच्या पार्लरमध्ये काम करू लागल्या. याच काळात त्यांचा पुस्तकांवरील जुना विश्वास पुन्हा वाढला आणि त्यांनी आपले शिक्षण पुन्हा सुरू केले. यानंतर त्यांनी मध्य प्रदेश प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.
advertisement
11/12
२००५ मध्ये, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी मुलाखत, पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना एकूण ₹७५,००० ची शिष्यवृत्ती मिळाली. विशेष म्हणजे, सविता यांनी MPSC परीक्षा दोनदा दिली होती. सविता प्रधान यांची पहिली पोस्टिंग मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात सीएमओ (मुख्य नगर पालिका अधिकारी) या पदावर झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यावेळी त्यांचा मुलगा केवळ चार महिन्यांचा होता. आपल्या लहान बाळाला सोबत घेऊन त्या कार्यालयात जात असत आणि आपले कर्तव्य बजावत होत्या.
advertisement
12/12
आयुष्यात पुढे जात त्यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसरे लग्न केले. आज त्या सन्माननीय प्रशासकीय अधिकारी म्हणून आनंदी आणि समाधानी जीवन जगत आहेत. महुआ वेचण्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, संघर्ष, छळ आणि अंतिमतः MPSC अधिकारीपदापर्यंतचा विजय, हा जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक प्रेरणास्रोत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story : 16 व्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून मारहाण, आयुष्य संपवण्यापर्यंत पोहोचली, अन् एका गोष्टीनं बदललं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल