TRENDING:

Success Story: सरकारी गाडी सोडून रोज सायकलवर जाणारे जिल्हाधिकारी, कोण आहेत डॉ. सतीश कुमार?

Last Updated:
IAS अधिकारी डॉ. सतीश कुमार एस. यांनी वेल्लोरपासून सतना कलेक्टरपर्यंतचा प्रवास शिस्त, संवेदनशीलता आणि जनसेवेच्या भावनेने गाठला, सायकलवर कार्यालयात जाण्याची चर्चा सोशल मीडियावर.
advertisement
1/8
सरकारी गाडी सोडून रोज सायकलवर जाणारे जिल्हाधिकारी, कोण आहेत डॉ. सतीश कुमार?
ठरवलं होतं काहीतरी वेगळं पण झालं वेगळंच, मात्र तरीही हार न मानता त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. सरकारी गाडी असतानाही रोज सायकलने कार्यालयात जाणाऱ्या IAS अधिकाऱ्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होत आहे. मूळचे तमिळनाडूमधील वेल्लोरचे रहिवासी असलेल्या डॉ. सतीश कुमार एस. यांना लहानपणीच कलेक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली होती. लहान असताना ते कधी कधी त्यांच्या वडिलांसोबत कलेक्टरेटमध्ये जात असत.
advertisement
2/8
कलेक्टर व्हावं असं त्यांना नेहमी वाटायचं, मात्र त्यावेळी ते पूर्ण झालं नाही, त्यांनी MBBS ची पदवी घेतली आणि डॉक्टर झाले. सतीश कुमार यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (MBBS) ची पदवी घेतली, त्यांचं डॉक्टर नव्हायचं स्वप्न नव्हतं, तर प्रशासकीय अधिकारी बनण्याचे होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षणासोबतच सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी केली आणि २०१३ मध्ये यश मिळवून भारतीय प्रशासनिक सेवेत निवड झाली.
advertisement
3/8
आई शिक्षिका आणि वडील पटवारी यांच्या घरात सतीश यांचे संगोपन झाले. अत्यंत शिस्तबद्ध आणि सेवाभावी वातावरणात ते वाढले. अभ्यासात त्यांना लहानपणापासूनच रुची होती, मुळातच हुशारी आणि ध्येय ठाम असल्याने त्यांनी त्या दिशेनं प्रयत्न केले आणि त्यांना यशही मिळालं. आज ते आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना सायकल वापरतात.
advertisement
4/8
आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत सतीश कुमार यांनी कठोरता आणि संवेदनशीलतेचा समतोल राखला आहे. ३१ जुलै २०२३ पर्यंत भिंड जिल्ह्याचे कलेक्टर असताना त्यांनी शिस्तप्रिय प्रशासनाची प्रतिमा निर्माण केली, ज्यामुळे ते सामान्य जनता आणि अधिकारी अशा दोघांमध्येही चर्चेत राहिले.
advertisement
5/8
२८ जानेवारी २०२५ मध्ये मध्य प्रदेश सरकारच्या प्रशासकीय फेरबदलामुळे त्यांची सतनाचे कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी ते मध्य प्रदेश स्टेट को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड, भोपाळचे व्यवस्थापकीय संचालक आणि पशुपालन व दुग्धव्यवसाय विभागात पदसिद्ध उपसचिव म्हणून कार्यरत होते.
advertisement
6/8
सतनामध्ये पदभार स्वीकारताच त्यांनी खासगी शाळांच्या मनमानीवर त्वरित आणि कठोर कारवाई केली. पुस्तके आणि गणवेशाच्या नावाखाली पालकांची लूटमार करणाऱ्या प्रकरणांमध्ये त्यांनी दंड ठोठावला, ज्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आणि शिक्षण व्यवस्थेत शिस्त येण्याची आशा निर्माण झाली.
advertisement
7/8
जनसुनवाई दरम्यान एका शाळेचे मुख्याध्यापक गैरहजर आढळल्यामुळे त्यांनी त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. हे पाऊल दर्शवते की ते कर्तव्यातील निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारत नाहीत आणि जनतेच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य देतात.
advertisement
8/8
डॉ. सतीश कुमार एस. यांची कहाणी केवळ एका आयएएस अधिकाऱ्याची नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची आहे. त्यांची शिस्त, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता आणि जनसेवेची भावना, विशेषत: यूपीएससीसारख्या कठीण परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: सरकारी गाडी सोडून रोज सायकलवर जाणारे जिल्हाधिकारी, कोण आहेत डॉ. सतीश कुमार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल