Driving Tips : कार थांबवताना आधी ब्रेक दाबायचा की क्लच? योग्य पद्धत लगेच समजून घ्या नाहीतर इंजिनचं होईल नुकसान
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चुकीच्या पद्धतीने गाडी थांबवली तर केवळ इंजिनच नव्हे तर क्लच प्लेट आणि ट्रान्समिशन सिस्टीमलाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कोणत्या वेळी काय दाबावं आणि कोणती पद्धत योग्य हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
1/6

रस्त्यावर आपल्याला असंख्य गाड्या धावताना दिसतात. ज्यामध्ये बाईक, कार, टेम्पो सारखी वाहनं असतात. तसं पाहता लोक गाडी चालवण्याचं शिकून मग गाडी चालवायला हातात घेतात. पण असं असलं तरी देखील अनेकांना गाडी चालवण्याची योग्य पद्धत माहीत नसते.
advertisement
2/6
गाडी स्लो करायची असेल तर आधी ब्रेक दाबायचा का क्लच? असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. चुकीच्या पद्धतीने गाडी थांबवली तर केवळ इंजिनच नव्हे तर क्लच प्लेट आणि ट्रान्समिशन सिस्टीमलाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कोणत्या वेळी काय दाबावं आणि कोणती पद्धत योग्य हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
3/6
क्लच कशासाठी असतो?क्लचचं मुख्य काम म्हणजे गाडीचे चाक गिअरबॉक्सपासून वेगळे करणं. क्लच दाबल्यावर गाडीचे चाक गिअरशी जोडलेले राहत नाहीत. त्यामुळे इंजिनचा थेट ताण चाकांवर येत नाही. जर क्लच न दाबता थेट ब्रेक दाबला, तर गाडी थांबण्याचा प्रयत्न करेल पण गिअरमधून तिला पुढे जायला भाग पाडलं जाईल. त्यामुळे इंजिन बंद होणं (जाम होणं) किंवा ट्रान्समिशनला नुकसान होऊ शकतं.
advertisement
4/6
कमी स्पीडमध्ये गाडी कशी थांबवायची?जर तुम्ही गाडी गिअरच्या किमान स्पीडपेक्षा कमी स्पीडमध्ये चालवत असाल (उदा. ट्रॅफिकमध्ये), तर आधी क्लच दाबा आणि मग ब्रेक दाबा.किमान स्पीड म्हणजे अशी गती, जिथे गाडी फक्त गिअरवर, रेस न देता आपोआप पुढे सरकत असते. या वेळी जर तुम्ही आधी ब्रेक दाबला आणि नंतर क्लच, तर गाडी थांबत असताना इंजिनवर अनावश्यक ताण येऊ शकतो आणि गाडी दचके किंवा झटके देऊ लागेल.
advertisement
5/6
वेगाने चालत असलेल्या गाडीला कसं थांबवायचं?जर गाडी वेगात आहे, तर आधी ब्रेक दाबा. गाडीचा वेग कमी होत गिअरच्या किमान स्पीडपर्यंत आला की, मग क्लच दाबा. हे केल्याने गाडी सुरळीतपणे थांबेल आणि कोणतीही तांत्रिक बिघाड होणार नाही.
advertisement
6/6
आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावं?जर गाडी चालवताना अचानक समोर कोणी आलं आणि तुम्हाला इमर्जन्सी ब्रेक मारावा लागला, तर अशा वेळी क्लच आणि ब्रेक दोन्ही एकत्र दाबणं योग्य ठरतं. यामुळे गाडी लगेच थांबेल आणि इंजिन देखील बंद होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Driving Tips : कार थांबवताना आधी ब्रेक दाबायचा की क्लच? योग्य पद्धत लगेच समजून घ्या नाहीतर इंजिनचं होईल नुकसान