Internet खुपच स्लो चालतंय? अल्यूमिनियम फॉइलच्या या ट्रिकने WiFi चालेल सुपरफास्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
How To Increase Internet Speed: तुम्हाला तुमच्या वायफायच्या स्पीडचा त्रास होत असेल आणि अनेक उपाय करूनही तुम्हाला हवा असलेला स्पीड मिळत नसेल, तर तुम्ही एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करा. तुमचा इंटरनेटचा स्पीड रॉकेटसारखा होईल.
advertisement
1/6

नवी दिल्ली : तुम्ही घरून काम करत असाल आणि तुमचा इंटरनेटचा स्‍पीड कमी होऊ लागला तर तुम्हाला राग येणे स्वाभाविक आहे. आजच्या काळात, 3 जीबी डेटा देखील पुरेसा नाही, तेव्हा इंटरनेट किंवा वायफायचा कमी वेग बरेच काम बिघडू शकतो.
advertisement
2/6
इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी बरेच लोक त्यांच्या घरात वायफाय स्पीड एन्हान्सर देखील बसवतात. पण याचाही कोणताही महत्त्वाचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला येथे एक ट्रिक सांगत आहोत, ज्यामुळे तुमची स्लो इंटरनेट स्पीडची समस्या कायमची संपेल.
advertisement
3/6
खरं तर, आपण ज्या ट्रिकविषयी बोलत आहोत ती तुमच्या स्वयंपाकघरात सहज सापडू शकते. हो, अ‍ॅल्युमिनियम फॉइल. अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने तुम्ही तुमचा वाय-फाय सिग्नल सुधारू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या राउटरच्या मागे अॅल्युमिनियम फॉइल ठेवावे लागेल. यामुळे सिग्नल खास दिशेने रिफ्लेक्ट होईल. ते कसे वापरायचे पाहूया.
advertisement
4/6
अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरून इंटरनेटचा वेग कसा वाढवायचा :अ‍ॅल्युमिनियम फॉइल फोल्ड करा आणि ते तुमच्या राउटरच्या मागे छत्रीसारखे ठेवा. पण लक्षात ठेवा की फॉइल टच होऊ नये. राउटरला मागून अॅल्युमिनियम फॉइलने व्यवस्थित झाकून ठेवा जेणेकरून त्याचा सिग्नल इकडे तिकडे फिरणार नाही आणि तुम्हाला हवा तिथे येईल.
advertisement
5/6
पण हे देखील लक्षात ठेवा की राउटर जास्त गरम होऊ नये. फॉइल अशा प्रकारे ठेवा की ते इंटरनेट सिग्नल वाढवेल आणि तो ब्लॉक करणार नाही. अॅल्युमिनियम फॉइलची चमकदार बाजू अँटेनामधून येणाऱ्या किरणांना परावर्तित करते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्ही अॅल्युमिनियम फॉइल वापरता तेव्हा ते अशा प्रकारे घडी करा की त्याचा चमकदार भाग वर राहील.
advertisement
6/6
याशिवाय, वायफाय सिग्नल सुधारण्यासाठी राउटर नेहमी उंच ठिकाणी ठेवा. तुम्ही ते भिंतीवर लावू शकता. राउटरसमोर ग्‍लास, आरसा, कोणतेही फर्निचर किंवा भिंत असेल तर तिथे राउटर ठेवू नका. तुम्ही वायरलेस रिपीटर किंवा एक्स्टेंडर देखील वापरू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Internet खुपच स्लो चालतंय? अल्यूमिनियम फॉइलच्या या ट्रिकने WiFi चालेल सुपरफास्ट