आशिया खंडातील सर्वात लहान विमान; वजन, उंची अन् वेग पाहून विश्वासच बसणार नाही!
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
या विमानाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आलीय.
advertisement
1/5

केवळ 0.77 ग्रॅम वजनाचं चिमुकलं पण वाऱ्याच्या वेगानं भरारी घेणारं विमान तयार करण्यात आलंय. या इनडोअर विमानाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालीये. विमान तयार करणारे नागपुरातील एरोमॉडेलिंग तज्ज्ञ डॉ. राजेश जोशी यांनी ही माहिती दिली.
advertisement
2/5
राजेश जोशी यांनी 0.77 ग्रॅम वजनाचं आणि 4.5 सेंटीमीटर उंचीचं रबर पॉवर्ड इनडोअर विमान तयार केलंय. आतापर्यंत भारतातच काय, अख्ख्या आशिया खंडात असं विमान कोणीच तयार केलेलं नाही.
advertisement
3/5
त्यामुळे डॉ. जोशी यांनी या विमानाची नोंद करण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडे अर्ज केला होता.
advertisement
4/5
या विमानाची दोन्ही बुकात नोंद करण्यात आली आहे. जोशी यांनी आतापर्यंत पाऊण ग्रॅमच्या लहान विमानापासून 21 फूट उंचीची व 60 किलो वजनाची विमानं तयार केली आहेत. त्यासाठी त्यांना 3 गोल्ड मेडलसह 10 पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय.
advertisement
5/5
एरोमॉडेलिंगबाबत भारतात फारशी माहिती नसल्यामुळे लहान मुलं याकडे वळत नाहीत. परंतु मुलांनी एरोमॉडेलिंगकडे लक्ष दिल्यास हवाई क्षेत्रात जाण्याकडे त्यांचा कल वाढेल, असं मत डॉ. राजेश यांनी व्यक्त केलं. म्हणजेच लहानपणापासून मुलांची आपल्या ध्येयाप्रती आवड आणि वाटचाल सुरू होईल.(वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
आशिया खंडातील सर्वात लहान विमान; वजन, उंची अन् वेग पाहून विश्वासच बसणार नाही!