TRENDING:

Thane Metro : ठाणे मेट्रो 4चा मार्ग ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान किती आणि कोणती स्थानके असणार?

Last Updated:
Thane Metro 4: ठाणे मेट्रो 4 सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शनदरम्यान सुरू होणाऱ्या या मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
advertisement
1/7
ठाणे मेट्रो 4चा मार्ग ठरला; किती आणि कोणती स्थानके असणार?
ठाणेकरांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले ठाणे मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. ठाणे मेट्रो 4 सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून त्यासाठीच्या चाचणी प्रक्रिया वेगाने सुरू आहेत.
advertisement
2/7
मेट्रो प्रकल्प 4 अंतर्गत पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनदरम्यान मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील एकूण 10 मेट्रो स्थानकांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
advertisement
3/7
सुरुवातीला केवळ पहिल्या चार स्थानकांपर्यंत मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. आता राहिलेल्या सहा स्थानकांपर्यंत मेट्रोची ट्रायल रन प्रक्रिया सुरू असून तीही अंतिम टप्प्यात आहे.
advertisement
4/7
सर्व तांत्रिक चाचण्या, सुरक्षा तपासण्या आणि सिग्नल प्रणालीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो सेवा अधिकृतपणे सुरू केली जाणार आहे.
advertisement
5/7
मेट्रो 4 सुरू झाल्यानंतर ठाणे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतहा घोडबंदर रोडवरील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
6/7
मेट्रो 4 च्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांमध्ये कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गव्हाणपाडा आणि गायमुख या स्थानकांचा समावेश आहे.
advertisement
7/7
या मार्गामुळे ठाणे ते पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Thane Metro : ठाणे मेट्रो 4चा मार्ग ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान किती आणि कोणती स्थानके असणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल