ठाण्यातील 'हा' फूड स्पॉट गाजतोय! जिथं तब्बल 12 प्रकारच्या बिर्याणी; खाद्यप्रेमींची अक्षरशः उडते झुंबड
Last Updated:
Best Biryani Place In Thane : बिर्याणी खाण्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर ठाण्यातील या ठिकाणी नक्की जाऊन या. या ठिकाणी तुम्हाला चक्क 12 प्रकारच्या बिर्याणी खाण्यासाठी मिळणार आहेत.
advertisement
1/7

ठाण्यात अनेक फूड स्पॉट्स आहेत पण त्यापैकी एक ठिकाण सध्या जबरदस्त चर्चेत आहे. कारण इथे मिळते ती एक-दोन नव्हे तर तब्बल 12 हून अधिक प्रकारची बिर्याणी.
advertisement
2/7
ठाण्यातील ‘बिर्याणीया’ हे नाव सध्या खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. या दुकानाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की ठाणेकरांसह मुंबई आणि आसपासच्या भागांतूनही लोक खास या बिर्याणीचा स्वाद चाखण्यासाठी येतात.
advertisement
3/7
बिर्याणीया ही संकल्पना उभी केली आहे मनीष मोरे आणि लतिका मोरे या मराठी दांपत्याने. केवळ चवीवर प्रेम असल्यामुळेच नाही तर दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात बिर्याणी मिळावी या हेतूने त्यांनी हे दुकान सुरु केले. विशेष म्हणजे येथे बिर्याणीची सुरुवात फक्त 120 रुपयांपासून होते, त्यामुळे विद्यार्थ्यांपासून कुटुंबापर्यंत सर्वांना हे ठिकाण अत्यंत परवडणारे ठरते.
advertisement
4/7
या दुकानाची एक खासियत म्हणजे पहिले कोणतीही बिर्याणी टेस्ट करा मग ऑर्डर करा, त्यामुळे कोणती बिर्याणी आवडते ते ठरवल्यानंतर सहज ऑर्डर देता येते. ग्राहकांच्या चवीचा आदर करणारी ही सुविधा ठाण्यात फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे.
advertisement
5/7
इथे उपलब्ध असलेल्या बिर्याणींच्या प्रकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे बाहुबली बिर्याणी. बाहुबली सिनेमाची धमाल तुम्ही पाहिली असेल पण इथे मिळणारी बाहुबली बिर्याणी तितकीच भन्नाट आहे.
advertisement
6/7
याशिवाय इथं हैद्राबादी बिर्याणी, चिकन टिक्का बिर्याणी, मलई बिर्याणी या तिन्ही व्हरायटीज तर इथल्या मोस्ट डिमांडेड लिस्टमध्ये येतात. मलई बिर्याणीची क्रिमी टेक्स्चर, चिकन टिक्क्याची स्मोकी चव आणि हैद्राबादी बिर्याणीचा मसालेदार सुगंध हे तिन्ही पर्याय ग्राहकांना पुन्हा पुन्हा इथे खेचून आणतात.
advertisement
7/7
महत्वाचं म्हणजे फक्त नॉन-व्हेज नाही तर व्हेज बिर्याणीचेही इथे उत्तम पर्याय मिळतात. पनीर बिर्याणी, व्हेज बिर्याणी, मशरूम बिर्याणी असे पर्याय व्हेज प्रेमींसाठी खास उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
ठाण्यातील 'हा' फूड स्पॉट गाजतोय! जिथं तब्बल 12 प्रकारच्या बिर्याणी; खाद्यप्रेमींची अक्षरशः उडते झुंबड