डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? हिप्पोने केली भविष्यवाणी; VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असताना एका हिप्पोचा म्हणजे पाणघोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्याने अमेरिकेच्या निवडणुकीबाबत भविष्यवाणी केली आहे.
advertisement
1/5

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प हे यासाठी उमेदवार आहेत. यांच्यापैकी अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असेल, याची उत्सुकता फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला आहे.
advertisement
2/5
डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील राष्ट्राध्यक्ष कोण होईल हे जनतेच्या मतावर अवलंबून आहे. पण त्याचवेळी एक फेमस हिप्पोपोटॅमस म्हणजे पाणघोड्याने याबाबत भविष्यवाणी केली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
advertisement
3/5
थायलंडच्या सी राचा येथील खाओ खेव ओपन झूमधील हा बेबी हिप्पो, ज्याचं नाव मू डेंग आहे. याचा अर्थ 'जंपिंग पिग' असा होतो.
advertisement
4/5
मू डेंगचा जन्म जुलै 2024 मध्ये झाला. हा हिप्पो खूप फेमस आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. त्याने अमेरिकेच्या निवडणुकीबाबत भविष्यवाणी वर्तवली आहे.
advertisement
5/5
बेबी मू डेंगसमोर दोन टरबूज ठेवण्यात आले. एकावर डोनाल्ड ट्रम्प तर एकावर कमला हॅरिस यांचं नाव लिहिण्यात आलं. बेबी हिप्पो पाण्यातून बाहेर आला आणि त्याने ट्रम्प यांच्या नावाचं टरबूज खाल्लं. याचा अर्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार, असं समजलं जात आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? हिप्पोने केली भविष्यवाणी; VIDEO VIRAL