TRENDING:

2025 पेक्षाही खतरनाक आहे 2026 वर्ष? अडीच महिने आधीच समोर आली बाबा वेंगांची भयानक भविष्यवाणी

Last Updated:
Baba Vanga Prediction For 2026 Year : 2025 वर्षासाठीही त्यांनी युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी केली होती आणि तसं पाहायलाही मिळालं.  आता 2026 वर्षाबाबतही बाबा वेंगाची भविष्यवाणी समोर आली आहे.
advertisement
1/5
2025 पेक्षाही खतरनाक आहे 2026 वर्ष? अडीच महिने आधीच समोर आली बाबा वेंगांची भयानक
2025 वर्षे युद्ध, विमान अपघात आणि नैसर्गिक आपत्तीसाठी लक्षात ठेवलं जाईल. आता हे वर्ष संपायला फक्त अडीच महिने शिल्लक आहेत. यानंतर आपण 2026 वर्षात प्रवेश करू. नव्या वर्षाबाबत नवीन स्वप्न, नवीन आशा, नवे संकल्प... पण या वर्षात काय वाढून ठेवलं आहे, काय घडणार याचीही मनात भीती. आता या वर्षाबाबत बाबा वेंगांची भविष्यवाणी समोर आली आहे.
advertisement
2/5
बाबा वेंगा यांचं खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरियात झाला. त्यांचं बालपण सामान्य होतं पण जेव्हा त्या 12 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी आपली दृष्टी पूर्णपणे गमावली. असं म्हटले जातं की या घटनेमुळे त्यांना दिव्य दृष्टी मिळाली, त्यांना भविष्य दिसू लागलं.
advertisement
3/5
बाबा वेंगा यांनी बऱ्याच भविष्यवाणी केल्या. काही घटना त्यांनी सांगितल्या तशा घडल्यात. त्यामुळे त्यांनी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरत असल्याचा दावा केला जातो. 2025 वर्षासाठीही त्यांनी युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी केली होती आणि तसं पाहायलाही मिळालं.  आता 2026 वर्षाबाबतही बाबा वेंगाची भविष्यवाणी समोर आली आहे.
advertisement
4/5
बाबा वेंगाने 2026 सालाच्या केलेल्या भविष्यवाणीत आर्थिक आपत्तीचा समावेश आहे ज्याला तिने कॅश क्रश असं नाव दिलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये जागतिक स्तरावर गंभीर आर्थिक संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी भाकीत केले आहे की या वर्षी डिजिटल आणि भौतिक चलन प्रणाली दोन्ही कोलमडतील, ज्यामुळे रोख रकमेचा तुटवडा निर्माण होईल.
advertisement
5/5
या रोख रकमेमुळे बँकिंग संकट, चलन मूल्ये आणखी कमकुवत होऊ शकतात आणि बाजारात तरलतेचा अभाव निर्माण होऊ शकतो. या सर्वांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि महागाई, उच्च व्याजदर आणि तंत्रज्ञान उद्योगात अस्थिरता यासारख्या संकटांना तोंड द्यावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
2025 पेक्षाही खतरनाक आहे 2026 वर्ष? अडीच महिने आधीच समोर आली बाबा वेंगांची भयानक भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल